नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्यातील धर्माबाद शहरात तसेच ग्रामीण भागात राशन दुकानदार अपली शेनखाऊवृत्तीतुन बाहेर येण्यास तयार नाहीत आजच्या डिजीटल युगात हि गोगरिबाच्या अन्नधान्यावर डल्ला मारण्याचा नेहमीचा प्रकार चालुच असल्यामुळे गोरगरिब लाभधारक वंचीत झाले असुन वरुनच धान्य आले नसल्याचे भासवुन एका महिण्याचा वाटप तर एका महिण्याचे धान्य गायब करण्यात महसुल विभागाच्या संगणमताने यशस्वी होत असल्याचे बोलले जात आहे.
राज्य शासन ग्रामीण भागातील नागरिकांसाठी स्वस्त धान्य उपलब्ध करून देते परंतू स्वस्त धान्य दुकानदार थेट लाभार्थ्याला शासनाने दिलेले धान्य देत नाही.2024 फेब्रुवारी रोजीचे धान्य काही दुकानदारांनी गरीबाना धान्य दिले नाहीत.तर अंतोदय कार्डधारकाला शासनाने साखर दिली असली तरी ती साखर लाभाथ्याँ पर्यंत अद्यापही पोहोचली नाही. स्वस्त धान्याच्या काळ्या बाजाराकडे पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार पंडित राठोड तसेच तहसीलदार दुर्लक्ष चालविल्याचे दिसून येत आहे.पंतप्रधान मोदी यांनी 80 कोटी गरिब जनतेला पुढचे पाच वर्ष दर महिण्याला अन्नधान्य देणार असल्याचे घोषीत केले. घोषीत केलेले अन्नधान्य वेळेत दुकानदारास पुरवठा होत असताना सदरिल धान्य महसुल विभागाच्या संगणमताने वर्षातुन सहामहिण्याचे धान्य गरिबच्या तोंडाचा घास काढुन घेण्यात यशस्वी होऊन पंतप्रधानांच्या योजनेचा फज्जा उडवुन मोदिंना खोटं ठरविण्याचे काम महसुल विभाग व राशन दुकानदार करत असल्याचे दिसत आहे.
धर्माबाद तालुक्यात सरकारी स्वस्त धान्य दुकानात (रेशन दुकान) जणू धान्याचे दोनच पर्याय ठेवण्याचे निर्बंध आहे अशी स्थिती बनवण्यात आली आहे.
यावेळी तांदळासोबत गहू दिला जात असला तरी डाळ व सखार आलेली नाही. दोन ते तिन वर्षापासून गोरगरीबांची साखर येथील दुकानदारांनी गायब करुन काळ्या बाजारात विकुन आपले काळे तोंड पुन्हा काळे करत आहे. या प्रकाराला केवळ महसुल विभाग जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या एक ते दोन वर्षापासून शासनाकडून मोफत धान्य देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु संबंधित विभागात नेहमीप्रमाणे दिरंगाईचे क्रम सुरू राहिले.पीओएस मशीनमध्ये धान्याचे अपलोडींगत उशिराने झाले आणि संपूर्ण प्रक्रियेला उशीर झाला. खरे तर धान्याच्या पुरवठ्याला अत्यावश्यक सेवा समजून विभागाने गांभीर्य दाखवायला हवे होते मात्र तसे झाले नाही.
शासनाने ज्या पद्धतिने नियमावली स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्या प्रमाणे तालुक्यात एकाही स्वस्त धान्य दिसून येत नाही. या प्रकारा कडे नगर पालिका अंतर्गत दक्षता समितीच्या सदस्याचे नाहि तसेच स्थानिक लोकल लिडर यांचे हि सुध्दा लक्ष नसल्याचे दिसुन येत आहे. स्थानिक पक्ष कार्यकर्ते कपडे कडक जमिनी हडप विद्यमान लोक प्रतिनिधी च्या हिम्मतीवर करण्यातच धन्यता मानत असल्याचे पहावयास मिळत आहे. तसेच कार्यालयातील बाबु (कर्मचारी)हे दहा विस रुपयासाठी राशन दुकानदार बाबु ला शेनखाण्यासाठी मोकळ सोडुन त्याला राशन दुकानदार क्षेत्रात बाबुराव बविण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.
अंतोदय कार्ड धारकांना साखर प्रती कार्ड एक किलो दिली जाते पण धर्माबाद तालुक्यात शहरा सह ग्रामीण भागात गरीब व्यक्तीला (अंतोदय कार्डधारकांना) साखर दिले जात नसल्याचे दिसुन येते आहे. सद्य:स्थितीत सरकारी धान्याची गोरगरीबांना गरज आहे परंतु त्यांना केवळ तांदूळ आणि गव्हावरच गुजराण करावी लागत आहे.तर ते सुध्दा वेळेवर मिळत नाही.एक दोन महिन्यांचे धान्य गायब केला जातो .विशेष म्हणजे, नागरिकांच्या गरजेशी संबंधित या बाबीकडे आपल्या पोळ्या शेकणाऱ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ताही मौन धारण करून आहेत.
संकटाच्या या काळात धान्याचे पर्याय उपलब्ध करवून देण्यावर भर दिला जात नसल्याचे दिसून येते आहे. या सर्व बाबीकडे खासदार,तसेच आमदार यांनी नेमुण दिलेली दक्षता समीती आणि मा. जिल्हाधिकारी साहेब लक्ष देतील का? असा गंभिर प्रश्न भुकेल्या लाभार्थ्या कडुन केला जात आहे.