जिल्हा विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
लातूर :दि.२.अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेवून केली आत्महत्या.केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाकूर पोलीस स्टेशन येथे सावकारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की,मौजे मुळकी उमरगा येथील शांती निकेतन विद्यालय येथील सेवक या पदावर रुज्जू असणारे विरभद्र कुंभार यांनी अहमदपूर येथील त्यांच्या घरा शेजारील शिवानंद कासले यांच्या कडून 19/7/2022 रोजी अहमदपूर येथे प्लॉट विकत घेण्यासाठी 2 लाख रुपये घेतले होते.
त्यानंतर काही दिवसांनी शिवानंद कासले यांना 2 लाख 60 हजार रुपये व्याजासहित परत केले असता सुद्धा अनेक वेळा माझ्या पतीला आरोपी फोन करून अजून रुपये देण्यासाठी तगादा लावायचा सार्वजनिक ठिकाणी तुझा अपमान करतो,माझे पैसे नाही दिलास तर परिणाम भोगावे लागतील अश्या वारंवार धमक्या मुळे माझे पती विरभद्र कुंभार हे दि.22 फेब्रुवारी 2024 रोजी हल्ली मुक्काम करणाऱ्या घरी न येता आमच्या मूळ गावी घारोळा येथील शेती मधील चिंचेचा झाडाला शिवा कासले यांनी दिलेल्या हिशोबाच्या कागदावर आत्महत्येपूर्वी सोसाइट नोट लिहून.व्हाट्सअप वरती शेवटचे शिवा कसलेच देणं असा व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवला व ते गळफास घेऊन जीवन संपविले अशी तक्रार प्रतिभा कुंभार यांनी चाकूर पोलीस स्टेशन येथे ता.26 फेब्रुवारी रोजी दिल्या प्रकरणी आरोपी शिवानंद कासले यांच्यावर भा.दं.वि. संहितेनुसार 306 दाखल करण्यात आले आहे.आरोपी अद्यापही फरार आहे.त्याच्या मुसक्या आवळून त्याला कधी अटक करणार असा संतप्त सवाल नागरिकांतून पोलीस प्रशासनाला विचारल्या जात आहे.अधिकचा तपास पीएसआय गाडगे हे करीत आहेत.