महामंडळ कंपनीचे सोयाबिन बियाणे उगवलेच नाही….

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

कृषि विभाग मात्र कुंभकरण झोपीत.

हिमायतनगर ता.प्रतिनिधी/ जरगेवाड बाबाराव
हिमायतनगर :  12 जुलै हिमायतनगर तालुक्यातील सोयाबिन बियाण्याची पेरणी झाली असली तरी, बियाण्याची उगवण होतच नाही.
एक महिना कोरडा दुष्काळ, एक महिना उशिरा पेरणी झाली. महामंडळाच्या बोगस सोयाबिन बियाण्याची हिमायतनगर कृषि सेवा केंद्रवर विक्री झाली आहे. सर्वे नंबर अनुक्रमे 252, 281, 286 या क्षेत्रातील मौजे सवना ज. येथील शेतकरी सौ. अस्मिता अक्कलवाड, शिवाजी अक्कलवाड, सौमित्रा गोपेवाड सवना ज. येथील शेतकऱ्यांनी महामंडळ कंपनीचे सोयाबिन अनुदानित बियाणे परमीटवर खरेदी केले आहे. दिनांक 7 जुलै रोजी पेरलेले बियाणे आज रोजी उगवण झाली नाही. संबंधित दुकानदारस शेतातील सोयाबिन बियाणे उगवलेच नाही. असे सांगितले असता, तुम्ही महामंडळ कंपनीच्या साहेबांना बोला. असे सांगुन आपली जबाबदारी त्यांनी झटकली.

हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी यांचा अंकुशच नाही.

हिमायतनगर कृषि केंद्रावर तालुका कृषी अधिकारी यांचा कुठलाच वचक राहिला नाही. म्हणुन शेतकऱ्यांना बोगस सोयाबिन बियाणे विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे. असे तालुक्यातील शेतकरी बांधवांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या हाती बोगस बियाणे विक्री करणाऱ्या महामंडळ कंपनीच्या अधिकाऱ्यांवर शासन काय? कारवाई करणार याकडे सोयाबिन बियाणे उगवण न झालेल्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच शेतकऱ्यांना बियाणे, खते, पेरणी खर्च द्यावा. अन्यथा तालुका कृषी कार्यालय हिमायतनगर कार्यालयापुढे आमरण उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Share This Article
error: Content is protected !!