नांदेड जिल्हा प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नांदेड : लोकस्वराज्य आंदोलन युवक आघाडी नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने येत्या दिंनाक दहा मार्च २०२४ रोज रविवारी दुपारी १२:०० वाजता सिडको नविन नांदेड येथील डॉ.अण्णाभाऊ साठे सभागृहात संघटनेच्या प्रमुख पाहुण्यांच्या व मान्यवराच्यां उपस्थितीत संपन्न होणार आहे.भव्य कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधुन वेगवेगळ्या आघाड्यांच्या कार्यकर्ता,पदाधिकार्यांना नियुक्ती देऊन नवीन जबाबदारी दिली जाणार आहे.या बैठकीचे अध्यक्ष म्हणून रावसाहेबदादा पवार नायगाव बा.प्रदेशाध्यक्ष कामगार आघाडी महाराष्ट्र तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा रामचंद्रजी भरांडे सर नांदेड राहणार आहेत.बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून व्ही.जी.डोईवाड प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र,समतावादी एम्पलॉईजचे बालाजी पाटोळे सर,संतोष तेलंग,डी.एन.मोरे खैरकेकर, राजकुमार जांभळीकर,प्रा.ईरवंत सुर्यकार सर,जेष्ठ नेते एकनाथ रेडे, सुजीतकुमार निळकंठे, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष कैलास सूर्यवंशी,धोंडोपंत बनसोडे जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर जिल्हा,संतोष भालेराव होंडाळकर जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया नांदेड जिल्हा,महानगराध्यक्ष सुनील जाधव, गोविंद जोंधळेआंबेगावकर आदी जणाची उपस्थित राहणार आहे.बैठकीत नांदेड दक्षिण तालुक्यातील समाज बांधव, युवक, महिला तसेच कर्मचारी,सेवानिवृत्त कर्मचारी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा नेते अंकुश गायकवाड,निरंजन शिंदे,योगेश पाचंगे, सचिन सूर्यवंशी,सुरज सूर्यवंशी आदींनी केले आहे.