नायगाव ता प्रतीनिधी/अशोक वाघमारे
नायगाव – नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने नारीशक्ती वंदन यात्रेचे आयोजन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा भारतीय जनता पार्टीचे महिला जिल्हाध्यक्ष सौ पूनम ताई राजेश जी पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. दरम्यान महिला सशक्तिकरणा करण्यासाठी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी आलेल्या योजना व महिला सक्षमीकरणाचे काम मोठ्या जोमामध्ये केले असून. त्यामुळे देशातील महिला हे केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेऊन जीवनमान उंचावत आहेत. श्री नरेंद्र मोदी यांनी नारीशक्ती वंदन कार्यक्रमाला थेट प्रक्षेपण करून नायगाव मतदार संघातील नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील महिला हे एकत्र जमवून श्री नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह प्रक्षेपनाचे श्रवण केले आहे. देशातील महिलांसाठी केलेले काम सन 2014 ते 2019 पासून महिला गोरगरीब व सामान्य जनता करिता राबवलेल्या योजना, व त्यांच्यासाठी केंद्र सरकारने केलेले काम यांचे श्री नरेंद्र मोदी यांनी थेट प्रक्षेपणातून देशातील महिला यांना संबंधित केले आहे. महिला ही देशाच्या विकासातील अविभाज्य भाग असून देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान असल्याचे देखील श्री नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले आहे. श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलेला मान सन्मान देऊन देशातील महिलेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आणि देशातील महिलेसाठी आलेल्या योजना व उपक्रम यातून महिला देशाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये वावरात असतात. हे भारतीय जनता पार्टीचे महिलांसाठी असलेली आदरांची भूमिका घेत भारतीय जनता पार्टीने देशांमध्ये विकासाचा अजेंडा राबविलेला आहे. म्हणून गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या कामाच्या लेखा झोका जनतेपुढे ठेवून आगामी लोकसभा व विधानसभा साठी भारतीय जनता पार्टीने कामाला सुरुवात केल्याचे देखील सांगण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीने देशांमध्ये विकासाचा अजिंठा घेऊनच काम करत राहिलेले आहे आणि पुढे पण काम करतच राहील यामुळे 2024 च्या निवडणुकीमध्ये आपकी बार 400 च्या पार अशा घोषणा देऊन नारीशक्ती वंदन यात्रा नायगाव शहरांमध्ये नायगाव मुख्य चौकापासून ते बोमनाळे यांच्या मिल पर्यंत काढण्यात आली आहे. का कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सौ पूनम ताई राजेश पवार, सौ वडजे मॅडम व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महिला कार्यकर्त्या व नायगाव उमरी धर्माबाद येथील महिला कार्यकर्त्या आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस श्री बाबासाहेब पाटील हंबर्डे, तालुका कार्यकर्ते श्री भगवान पाटील ढगे कोठाळेकर, व अन्य भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते तर मोठ्या संख्येत महिला वर्ग देखील असल्याचे दिसून आले आहे.