नायगाव/प्रतिनिधी अशोक वाघमारे
नायगाव पोलीस ठाण्याच्या अंर्तगत येत आसलेल्या गडगा येथे मांजरम रोड शेजारी एका हाॅटेलातुन खुलेआम मटका सुरू आहे. दिवसभर ओपन – क्लोज वर लाखो रुपये लावले जातात.परंतु सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रिद घेतलेले पोलिस मात्र गप्प गिळून असतात.
मांजरम चौकीच्या बीट जमादाना हाताशी धरून आर्थिक देवान घेवान करुन मटका सुरू असून. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिसांना आसताना देखील कारवाई करित नाहीत.उलट मटका चालकांना सहकार्य करित असल्याचे चित्र आहे.या बाबींकडे पोलिस अधीक्षकांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे.
सद्या गडगा ठिकाण मटक्याचे माहेर घर बनले आहे.रातोळी येथील मटका व्यवसायक गडग्याच्या तरुण वर्गाला मटक्याचे वेड लावले आहे.अनेकांचे ससार उघड्यावर आले आहेत.मटक्यामुळे संसारात आर्थिक संकटांचे चटके भोगावे लागत आहेत.
शिवाय मुलाच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.वडिल मटक्यात गुंग झाल्याने विद्यार्थीना शाळा सोडून आर्थिक भार उचलावा लागतो.विशेष म्हणजे महिलांना रोजदारी करुन संसाराचा गाढा हाकावा लागतो.अतिशय धक्कादायक प्रस्तिती येथील महिलाची झाली आहे.
नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अवैध व्यवसायावर विशेष नियत्रंण ठेवणे जाणे आपेक्षित आहे. पोलिसांसह एलसीबीची मोठी यंत्रणा असतानाही ग्रामीण भागात मटका व्यवसाय तेजीत सुरु आहे. मांजरम रोड शेजारी मटक्याचा व्यवसाय खुलेआम चालतो.ओपन – क्लोजच्या आकड्यांच्या चिठ्या रस्त्यावर दिसून येत आहेत.
मटका लावण्यासाठी सकाळी – संध्याकाळी येथे गर्दी पहावयास मिळते. दररोजच हे चित्र निदर्शनास येते. मात्र पोलिसांच्या निदर्शनास या गोष्टी येत नाहीत.लपून – छपून चालत असलेला मटका आता पोसिल प्रशासनाची पोकळ भुमिका असल्याने मटका खुलेआम सुरु आहे.