नांदेड जिल्हा प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नांदेड – नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील सौ. रेखाताई अनिल कांबळे यांची जिद्ध व चिकाटी ने अथक परिश्रमातून महिला स्वावलंबी बनविण्याकरिता घेतलेल पुढाकार यातून महिलेनी काय करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण सौ. रेखाताई कांबळे यांचे आहे.एखाधी महिलेने मनात आणले तर काहीही साध्य करु शकते हे कुटूर ता नांयगाव येथील रेखाताई अनिल कांबळे यांनी दाखवून दिले आहे .
केवळ महिला सक्षमीकरणाचा उद्देश समोर ठेवत रमाबाई महिला आंबेडकर महिला बचत गट या माध्यमातून त्यांनी महालक्ष्मी महिला बचत गटाच्या उत्पादन माध्यमातून घोंगडी व्यवसाय प्रकल्प महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला आहे .
कुंटूर येथील रेखाताई कांबळे या लग्नानंतर सासरी येऊन त्यांनी आपल्या शिक्षणालाही साथ देत बचत गटाचे तयारी करून व्यवसायातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मार्गदर्शन केले .
व्यवसायाचा अनुभव गटाशी देऊन त्यांनी कुंटूर परिसरातील तसेच कुंटूर येथील नवीन नवीन महिलांना दुकानाचे व तसेच रोजगारांची माहिती दिली त्यांनी महिलांना व्यवसायाकडे मन वळीले व व्यवसाय त्यांनी महिलांना मिळून दिले .
व्यवसाय करत असतानाच महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या हाताला रोजगार देण्याची त्यांची तळमळ त्यांना स्वस्त बसू देईना अशातच बचत गटात संदर्भात कुठलाही अनुभव नसताना त्यांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान तालुका नायगाव जिल्हा नांदेड उमेद अंतर्गत श्री महालक्ष्मी महिला बचत गटाचे स्थापना केली व त्या गटाचा पारंपारिक व्यवसाय असलेल्या घोंगडी व मेंढी पालन यांचा महिला उत्पादन गटाची निर्मिती केली सुरुवातीला 2019 मध्ये या गटामार्फत अभियानामार्फत गटाच्या वतीने व्यवसाय सुरू केला.
समुदाय संसाधन व्यक्ती हा दर्जाही रेखाताई कांबळे यांना प्राप्त झाला त्यांनी त्या कामाला सुरुवातही करून त्यांच्या माध्यमातून 60 गटाच्या वर गटाची निर्मिती ही केली यावेळी महिलांच्या गाठीभेटी त्यांना प्रकल्प संदर्भात माहिती देणे अधिक कामे केली
हळूहळू त्यांना व्यवसाय करण्याची इच्छा मनामध्ये येऊ लागली त्यातूनच त्यांनी पापड मसाले गृह उद्योग सुरू केला. दहा महिलांची सोबती म्हणून निवड करत त्यांनी घोंगडी प्रकल्प हा उभारला असून त्यातूनही दूध व्यवसाय किराणा स्टोअर, बोटव्याची, मशीन ,पिटाची गिरणी, दुग्ध व्यवसाय,गाई म्हशी पालन, अशा विविध व्यवसायाकडे महिलांना मिळून देऊन त्यांचे व्यवसायिक दृष्ट्या त्यांना सक्षम्माचे धाडस केले.
इतर कुठलेही व्यवसाय भविष्यात बंद होऊ शकतात परंतु कृषी आधारित व ग्रामीण माणसाच्या हाताला कामे मिळवून त्यांच्या व्यवसाय पारंपारिक असणाऱ्या व्यवसायाला आधारित धरून त्यांनी हा व्यवसाय पुढे आपल्या जीवनाचा आर्थिक आधार त्यांनी केला.
हा कोरोना काळातही अनुभव पाहता त्यांनी घोंगडी व्यवसाय चांगलाच आर्थिक मदत दिली आहे.
गावातील आपल्या मेंढ्यांच्या केसांचे लोकर तयार करून त्यांनी हा घोंगडी व्यवसायासाठी काही महिलांना सक्षम केले यासाठी त्यांनी अभियानांतर्गत कर्ज प्रकरण करत त्यातून कुंटूर येथे हा घोंगडी प्रकल्पाचा मोठा व्यवसाय सुरू केला.
कच्चामाल म्हणजेच मेंढीचे केस काप केसापासून ह्या घोंगडीला उत्पन्न चांगल्या मिळत आहे.
त्याचं त्यांनी असलेल्या महिला काबाडकष्ट करून आज मुंबई ,नागपूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद लातूर अशा विविध ठिकाणी जाऊन आपल्या घोंगडी व्यवसाय उत्कृष्टपणे करत असून त्यातून लाखो रुपयांचा आर्थिक मदतही या महिलांना होत आहे.
त्यांनी दहा महिला मिळून हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करत असून त्यांना उत्पादन खर्चही कमी येत असून निव्वळ नफा उत्पादन मिळणार असून त्यातून हा पुढे यशस्वी करण्याचा मनुदय रेखाताई कांबळे यांनी केला आहे.
एकूणच महिलांनी आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून व्यवसायात उतरून यशस्वी होऊ शकतात हे रेखाताई अनिल कांबळे कुंटुरकर समुह संसाधन व्यक्ती
यांच्यासह इतर महिलांनीही दाखवून दिले आहे
.त्यांच्या प्रकल्पाला आज अनेक मान्यवर भेट दिली असून त्यातही वरिष्ठ अधिकारी तसेच महिलांचा कार्याला गौरव करत आहेत . दहा महिलांचे अथक परिश्रम असून या घोंगडी व मेंढी पालन व्यवसायात हा ग्रामीण कौशल्य प्रकल्प आहे . यात लाकडी साहित्य लागत असून यात वीज, विजेचा कोणताही स्रोत नसून वीजही लागत नाही त्यातच लाकडी साहित्य व लोकर पासून बनवलेले केसातली ,दोरी हाच त्यांचा मुख्य व्यवसाय बनला आहे. चिंचुकेपासुन बनवलेली पेस्ट अशा गावरानी व असल गावरान पद्धतीने बनवलेल्या घोंगडीला मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही आजही मागणी असून नायगाव तालुका येथील कुंटूर तील घोंगडी मुंबई दिल्ली उत्तर प्रदेश पर्यंतही घोंगडी गाजली आहे. त्यातूनही त्यांना आर्थिक फायदाही मोठ्या प्रमाणात होत असून याला या सर्व कार्यक्रमाला तालुका अभियान व्यवस्थापक व गटविकास अधिकारी एल, आर ,वाजे .व प्रकल्प तालुका अभियान व्यवस्थापक अमोल जोंधळे. इरवंत सूर्यकर ,बाबू चंद्रकांत डोळे ,इतर अधिकाऱ्यांनी व तसेच कुंटुर येथील समूह संसाधन व्यक्ति. रेखाताई कांबळे यांचा यांचे मार्गदर्शन सदर गटाला लाभले असून गावातील रणरागिणी म्हणून त्यांची चांगलीच ओळख आहे. या गटातील सर्व महिला व गावातील विविध व्यवसायाकडे महिलांनी आपला कल देत असून लाखो रुपये कर्ज घेऊन व्यवसाय मात्र आज जोमाने सुरू आहे. कुंटूर परिसरात महिला गटाची चळवळ मात्र जोरात सुरू आहे.आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त या महिलांना सलाम,
1)कुंटूर परिसरातील महिला उद्योग व्यवसायाकडे चांगलेच कल देत असून त्यांनी आपला उद्योग व्यवसाय सुरू करून बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधत आहेत. त्यामुळे त्यांचा परिवार व दारिद्र्यरेषेला झुगारून आर्थिक उलाढाल करत ते सक्षम बनत आहेत. याला शासनामार्फत उमेद अभियानाची मदत लाभली आहे . त्यामुळे महिला बचत गट चांगल्या पद्धतीने चालत असून महिलांचे ही सक्षमीकरण जोरात सुरू आर्थिक स्थिती चांगली आहे – रेखाताई कांबळे समूह संसाधन व्यक्ती कुंटुर ता नांयगाव जि नांदेड