नव मतदार व महिलानीं या विशेष रॅलीमध्ये झाले सहभाग.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी. गोविंद चिखलवाड
नांदेड – नव मतदार युवती व महिलांनी आपल्या एका मताने काय फरक पडू शकते, त्यासाठी नव मतदारांनी लोकशाही व्यवस्था अधिक बळकट व समृद्ध करण्यासाठी लोकशाहीचा श्वास असणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. 18 वर्षावरील प्रत्येकाने आपला मतदानचा अधिकार बजावावा असे आव्हान करत नांदेड शहरात आज नवंमतदार युवतींनी दुमदुमून सोडली. नव मतदार युवती व महिलांनी मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग होऊन मोठ्या प्रमाणात मतदान करावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलन करणवाल यांनी या विशेष रॅलीचे व बालिका पंचायत विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते. या आयोजनाला पाठबळ देत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला होता. युवतींच्या उत्साहात प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थित हे रॅली शहराच्या प्रमुख रस्त्यावर लोकशाहीचा जागर करीत होते. मतदान का कशासाठी या संदर्भातील अनेक घोषवाक्य हातातील फलक यावेळी लक्ष वेधून घेत होते. जागतिक महिला दिनाच्या ओचित्यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने नव मतदार युवती व महिलांसाठी मी मतदान का व कशासाठी करणार या विषयावर नांदेड शहरातून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरुवात करण्यात आली. प्रथमतः महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलन करणवाल , नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगे सोडण्यात आले व रॅलीला सुरुवात करण्यात आले. यावेळी उपस्थित उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर आदींची उपस्थिती होती.