आ.हंबर्डे यांनी केला सत्कार
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकत्याच जाहीर केलेल्या अनुसूचित जाती,जमाती, व भटक्या विमुक्त तसेच दिव्यांग व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सन २०२१-२२
सिडको नवीन नांदेड भागातील सामाजिक कार्यकर्ते तथा आंबेडकर चळवळीतील अग्रगण्य नाव असलेले नामदेव पदमने यांना नुकताच जाहीर करण्यात आला. रोख पंचवीस हजार रुपये व मानपत्र असे त्याचे स्वरूप आहे. नामदेव पदमने हे गेल्या अनेक दशकापासून आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्य करीत आहेत. तसेच दलित पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष राजा ढाले यांच्या समवेत त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली.अनेक महापुरुषांचे जीवनकार्य व त्यांचे विचार यावर ते समाजात जाऊन मार्गदर्शन करीत असतात.त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन,व्यसनमुक्ती, बाल शिक्षण अभियान,स्त्रीमुक्ती चळवळ, यावर देखील ते सतत मार्गदर्शन करीत असतात.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार नुकताच त्यांना जाहीर झाल्याचे नांदेड जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे व निरीक्षक दत्ता हरी कदम यांनी लेखी पत्राद्वारे त्यांना कळवले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दि.१२ मार्च रोजी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट नरिमन पॉईंट मुंबई २१ येथे संपन्न होणार आहे.
सुदरील पुरस्कार नामदेव पदमने यांना प्राप्त झाल्याबद्दल नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी त्यांचे जनसंपर्क कार्यालय येथे त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व अभिनंदन केले.व तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, सामाजिक,शैक्षणिक,राजकीय, क्षेत्रातील कार्यकर्त्यांसह अनेक आणि त्यांचे अभिनंदन केले आहे.