मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे आ.बालाजी कल्याणकर व मंगेश कदम यांनी केले स्वागत.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे नांदेड विमानतळावर आले असता उत्तर मतदार संघांचे आमदार बालाजीराव कल्याणकर व शिवसेना एस.सी.एस.टी. ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे रविवारी नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर दुपारी 2.15 वाजता आगमन झाले.हिंगोली येथील कार्यक्रमासाठी नांदेड येथे ते विशेष विमानाने आल्यानंतर विमानतळ येथे नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर व शिवसेना एस.सी.एस.टी. ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी मंगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली एस.सी. एस.टी.ओबीसी विभागाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत होत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना दिली. याप्रसंगी विमानतळावर शिवसेना -भाजप पक्षाचे नेतेमंडळी व पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!