सख्ख्या मुलानेच केला आईचा खून….

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

हिमायतनगर तालुक्यातील घटना… 

हिमायतनगर प्रतिनिधी/बाबाराव जरगेवाड

हिमायतनगर – तालुक्यातील मौजे पोटा बु येथे दिनांक 10 मार्च च्या सायंकाळी आरोपी सचिन उर्फ गजानन दत्ता जळपते यांनी त्यांच्या जन्म देणाऱ्या आईचा घरगुती कारणामुळे प्रकाश माने यांच्या शेतामध्ये दगडाने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना घडली…

याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु. येथे दिनांक 10 मार्च च्या सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास मयत अनिता दत्ता जळपते ही महिला प्रकाश माने यांच्या शेतात काम करत असताना त्यांच्याच सख्ख्या मुलाने सचिन उर्फ गजानन दत्ता जळपते यांनी घरगुती कारणामुळे जन्म देणाऱ्या आईचा दगडाने ठेचून खून केल्याची खळबळ जनक घटना घडली घटना समजताच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी हिमायतनगर पोलिसांना ह्याची माहिती देताच हिमायतनगर पोलिसांनी फिर्यादी मारोती संभाजी चित्तलवाड रा. वारंगटाकली मयत महिलेचा भाऊ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस स्थानकात गु.र.न. 38/20 कलम 302 भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदे साहेब हे करीत आहेत.

Share This Article
error: Content is protected !!