नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे.
नायगाव – तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी पावसाचे अति प्रत्यक्षात असल्याचे दिसून येत आहे. पावसाने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते पूर्ण महिना सातत्य जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील ७० ते ७५% टक्के शेतकऱ्यांची जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी पूर्ण झाली. जून महिन्यात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्याने त्याचाच आधार घेत पिके भरली व काही ठिकाणी पिके कोमजल्याने त्या ठिकाणी दुबार तर काही ठिकाणी तीबार पेरणी झाली. यातील बऱ्याच शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा परिणाम झाला असून त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार व तीबार पेरणीची करावी लागली आहे. शेत जमिनीमध्ये पेरलेले पीक चांगल्या प्रकारे बहरलेले असून त्यामध्ये शेतकऱ्यांनी निंदणी व कोळपणी करून पिकाला पोषक वातावरण तयार करून ठेवले असता जूनच्या शेवटच्या अखेरीस ते जुलै महिना संपत चालला असून देखील पावसाने अद्यापही दांडी मारल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.
यंदा शेतकरी शेतीसाठी अमाप खर्च केला आहे पण निसर्गाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. पाऊस न झाल्याने शेतातील पिकावर लाल रोगांचा व हिरव्या व काळ्या कीटकांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे पिकाचे येत असलेले कोंब नष्ट करून पिकाच्या पानांना चिद्र करत असल्याचे शेतकऱ्याकडून सांगण्यात येत आहे. आणि येथील बरेच सोयाबीन पिकावर करप्या रोगांचा देखील प्रादुर्भाव पडल्याचे दिसून येत आहे.
” येरे येरे पावसा तुला देतो पैसा ” अशी म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यावर आली आहे कारण यातील अल्प दिवसात येणारे पिकांचे फुले व कळी येत असून त्यासाठी पाण्याची कमतरता असल्याचे शेतकऱ्याकडून सांगण्यात येत आहे कारण फुल व गळ्यामध्ये पावसाची अत्यंत गरज असते परंतु निसर्गाने साथ देत नसल्याने पुन्हा शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्याच्या नजरा पूर्ण आभाळाकडे लागल्याचे दिसून येत आहे. मराठवाडा हे दुष्काळी भाग असून या ठिकाणी पावसाची नितांत गरज आहे पण पाऊस न पडल्यामुळे किमान सरकारने तरी दुष्काळी भागाचा विचार करून कर्जमाफी करावी अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसून येत आहे.