नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्हा काँग्रेस कमिटी नांदेडच्या नवनियुक्त पदाधिकारी यांच्या सत्कार करण्यासाठी आनंदनगर स्थित… मुलांच्या वसतिगृह येथे संतोष बोनलेवाड यांच्या तर्फे छोटे खाणी कार्यक्रम घेऊन ड्रा.श्रावण रॅपणवाड यांच्या अध्यक्षते खाली ऍड.सुरेंद्र घोडजकर,प्रदेशओ. बी.सि.चे पाटील साहेब, अल्पसंख्यांक चे असिफ भाई यांच्या उपस्थित नव्यानेच नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष (प्रभारी )पदी बी.आर.कदम काका यांची निवड झाल्यामुळे श्री.संतोष बोनलेवाड यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व तसेच ब्लॅक कमिटी शहर अध्यक्ष पदी मा.सुभाष दादा रायबोळे यांची सुद्धा निवड झाली असल्यामुळे त्यांचा सुद्धा सत्कार करून नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष पदी नव्याने निवड झालेले मा.गंगाधर सोंडारे,सुभाष पाटील,राजेश पावडे देशमुख,सुभाष राठोड,यांचा सुद्धा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे.
यावेळी अजय एडके,संजय वाघमारे,संजीवकुमार गायकवाड,सरपंच,व कर्मचारी वर्ग मोठया प्रमाणात उपस्तिथ होता.