जिल्हा प्रतिनिधी/
नांदेड – गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रदेश अध्यक्ष तथा महाराष्ट्र मुद्रण परिषदचे विभागी चे सचिव भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांचे वडील नागोजीराव आक्केमवाड यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्याचे वय ९३ वर्ष होते. त्यांनी संपूर्ण जिवन अध्यात्म व संतांच्या सत्संगात झोकून घेतले होते. अध्यात्मिक व सामाजिक भावना जपणारे एक विनेकरी तथा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आज हरवले, त्याबद्दल सर्व स्तरातून दुःख व्यक्त होत आहे.
त्यांचे पश्चात बालाजी आक्केमवाड, भुमन्ना आक्केमवाड, व्यंकटी आक्केमवाड हे तीन मुले, दोन मुली, नात – नातू , पंतू असा मोठा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी भोसी ता. भोकर जि. नांदेड येथे आज दि . १३ मार्च २०२४ रोज बुधवार दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहे.