भोपाळ – भोपाळ-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेसची ग्वाल्हेरजवळ बैलाला धडक बसली भोपाळ-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेसची ग्वाल्हेर आणि मुरैना दरम्यान शिकारपूर स्थानकाजवळ मंगळवारी एका बैलाला धडक बसली. ट्रेनचे इंजिन आणि काही डबे खराब झाले. ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात दहा नवीन वंदे भारत गाड्या सुरू केल्या त्या दिवशी ही घटना घडली.