जालना – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पर्यंत विस्तारित केल्या बद्दल शीख भाविकान काढून स्वागत डॉ.स.विजय सतबीर सिंघ प्रशासक

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत विस्तारितकरण करण्याची गुरुद्वारा बोर्ड व शीख समुदाय यांची मागणी मान्य करून महाराष्ट्रातील शीख समुदायाला आणखी एक मोठी भेट.या बद्दल देशाचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदी जी,रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी,रेल्वे राज्य मंत्री स. रवनीत सिघ जी बिट्टू व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांचे या निर्णयाचे गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ विजय सतबीर सिघ जी यांनी स्वागत केले आणि म्हटले की,महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतातील शीख समुदायासाठी हा खूप अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे.

      या विस्तारीतकरणा मुळे तख्त सचखंड श्री हजुर साहिब च्या दर्शना साठी येणाऱ्या भाविकांना कमीत कमी वेळात व आरामदायक प्रवास करण्यास मोठी मदत मिळेल वंदे भारत ट्रेन क्रमांक 20705 दररोज नांदेडहून सकाळी ५ वाजता निघेल आणि दुपारी २.२५ वाजता मुंबईला पोहोचेल तर ट्रेन क्रमांक 20706 मुंबईहून दुपारी १.१० वाजता निघेल आणि रात्री १०.५० वाजता नांदेडला पोहोचेल.अशी माहिती गुरु‌द्वारा अधीक्षक यांनी दिली आहे.

Share This Article
error: Content is protected !!