तिन्ही पक्षांचे किती आमदार असतील त्याचा फॉर्म्युलाही ठरला ! शहांच्या बैठकीत निघाला तोडगा?

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

दिल्ली : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर दिल्लीत अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याचं सांगितलं जात आहे. त्यानुसार, सरकारमधील तिन्ही पक्षांचे किती आमदार असतील त्याचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे.

या माहितीनुसार, तिन्ही पक्षांचा हा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ४-४-२ असा असणार आहे. त्यानुसार शिंदे गटाला ४, भाजपला ४ आणि अजितदादा गटाला २ मंत्रिपद मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे, असा एकूण १० मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.

यापूर्वी भाजपच्या ९, शिवसेनेच्या ९ आणि राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता नव्यानं १० आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यानुसार, भाजपचे १३, शिवसेनेचे १३ आणि ११ मंत्री मंत्रिमंडळात असतील असं एकूण ३७ आमदारांचं मंत्रिमंडळ असणार आहे. नव्या विस्तार या मंत्र्यांच्या नावची चर्चा शिवसेना – भरत गोगावले, बाबर, कद यांची नावं निश्चित असल्याचं सुत्रांकडून कळतंय

Share This Article
error: Content is protected !!