नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दुसऱ्या यादीत नितीन गडकरी, पियुष गोयल, खट्टर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. पक्षाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, अनुराग सिंह ठाकूर आणि प्रल्हाद जोशी यांना उमेदवारी दिली आहे. मंगळवारी हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते मनोहर लाल खट्टर यांचाही या यादीत समावेश आहे.
