अखेर जिल्हाधिकारी यांनी खोब्रागडे नगर 02 शासकीय शासकीय गोदामाच्या जागेतून रस्ता देण्याचे दिले लेखी आश्वासन

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर यांच्या प्रयत्नाला अखेर मिळाले यश,पंधरा दिवसानंतर जिल्हाधिकारी यांच्या लेखी आश्वासनाने बेमुदत धरणे आंदोलन आज घेतली मागे

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

 नांदेड -नांदेड,नवा मोंढा येथील शासकीय गोदामाची जागा, शासनाने महापालिकेला काही वर्षांपूर्वी विकली नांदेड महापालिकेने सदरील जागेत बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल उभारण्यासाठी खाजगी गुत्तेदाराला जागा ताब्यात दिली होती.

खोब्रागडे नगर 02 येथील महिला पुरुष यांनी गेली 2014 पासून रस्त्यासाठी वेगळ्या मार्गाने आंदोलन करून पाठपुरावा प्रयत्न केला.केलेल्या आंदोलनाला यश न आल्याने काही दिवसापूर्वी खोब्रागडे नगर या वस्तीत अरुंद रस्ते आहेत,रस्ते,नाले,ड्रेनेज लाईन,पिण्याचे पाणी,अनेक मूलभूत सुविधा नाहीत म्हणूनवंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर यांच्याकडे धाव घेतली आणि समस्या सांगितल्या. स्वतः राजेश्वर पालमकर यांनी वस्तीत येऊन भेट दिली स्वतः पाहणी केली आणि आपण महापालिका आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे सनदशीर मार्गाने न्याय मागू असे आश्वासन दिले.

लगेच 27 फेब्रुवारी पासून माननीय जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयासमोर या नगरातील शेकडो नागरिकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 29 फेब्रुवारी रोजी स्वतः वस्तीमध्ये येऊन रस्त्याची व मूलभूत सोय सुविधा संबंधी पाहणी केली.आणि महापालिका आयुक्त यांना लेखी पत्र देऊन अरुंद रस्त्याचा विकास करण्यासंबंधी लेखी पत्र दिले

जिल्हाध्यक्ष पालमकर व आंदोलनकर्त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. *144 सारखे कलम लागू असतानाही* नांदेड शहरात हे आंदोलन सुरू होते. आज माननीय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महापालिका आयुक्त यांना लेखी पत्र लिहून काही दिवसात खोब्रागडे नगर 02 येथील अरुंद रस्ते,नाले,ड्रेनेज लाईन,पिण्याचे पाणी,मूलभूत सोयी सुविधा संबंधी प्रश्न काही दिवसात सोडवण्याचे लेखी पत्र दिले.धरणे आंदोलनातील सर्व सहभागी कार्यकर्ते जिल्हा अध्यक्ष पालमकर यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आभार मानले.

असा जयघोष करून, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो,आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! अशा घोषणा देऊन आंदोलनाचा समारोप करण्यात आला.अशी माहिती प्रमोद जोंधळे,व राजेशीला खंडेलोटे यांनी आमच्या प्रतिनिधीना बोलताना दिली आहे.

Share This Article
error: Content is protected !!