नवी दिल्ली – वन नेशन वन इलेक्शन’ या उच्चस्तरीय समितीच्या अहवालात संसद आणि राज्य विधानसभांच्या एकाचवेळी निवडणुका आणि त्यानंतर १०० दिवसांच्या आत समक्रमित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची शिफारस केली आहे. त्यात एकच मतदार यादी आणि मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) ची शिफारस करण्यात आली आहे. पहिल्या एकाचवेळी निवडणुकांसाठी, 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ संपू शकतो, असे त्यात म्हटले आहे.