जोपर्यंत या माता-भगिनींचा निराधारचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही,सन ऑफ आंबेडकर ग्रुपचे सनी गायकवाड यांचा निर्धार,आज सनी गायकवाड यांचे तहसील कार्यालयावर आंदोलन

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

परतुर प्रतिनिधी : राज भदर्गे 

परतूर मंठा – तालुक्यातील दीनदुबळ्या च्या साठी नानाविध योजना ज्यात प्रामुख्याने श्रावण बाळ,संजय गांधी निराधार,अर्थसहाय्य योजना यांचा समावेश होतो यासाठीची मंजुरीसाठी ची होणारी मीटिंग गेली कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे या अनुषंगाने सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्याला घेऊन आज तहसील कार्यालय पुन्हा परतूर येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले शासन आणि प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जी प्रक्रिया राबवणे गरजेचे होते ती प्रक्रिया गेली कित्येक वर्ष झाली राबवण्यात आली नाही याचा जाब विचारण्यासाठी सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या वतीने तहसील कार्यालयाला आज भेट देण्यात आली त्याप्रसंगी अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले की लवकरात लवकर मीटिंग घेऊन या प्रस्तावांची मंजुरी घेण्यात येईल येत्या काही दिवसात कार्यवाही करून प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी करून पूर्ण अर्ज निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आले याप्रसंगी सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या वतीने निराधार लाभार्थ्यास जोपर्यंत त्यांचा हक्क मिळवून देणार नाही तोपर्यंत मी प्रशासनाला स्वस्त बसू देणार नाही असं पत्रकार बांधवांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केला तसेच हे प्रस्ताव निकाली काढण्यात आले नाही तर आंदोलनाचा स्वरूप हे भव्य करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला

वेळोवेळी समाजातील विविध सामाजिक प्रश्नांसंदर्भात सन ऑफ आंबेडकर ग्रुप रस्त्यावरून उतरून आंदोलन करीत आहेत यासाठी समाजातील विविध क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे

विविध क्षेत्रातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण भासल्यास तथा शासन दरबारी सर्वसामान्य नागरिकाचा छळ होत असल्यास सन ऑफ आंबेडकर ग्रुपने आवाहन केले आहे त्यांच्याशी संपर्क साधावा तसेच शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी तथा विद्यार्थिनींना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास सन ऑफ आंबेडकर ग्रुप सी संपर्क साधावा असे आवाहन सनी गायकवाड यांनी यावेळी केले यावेळेस दीपक मुंडे रामदास जाधव मोहन गायकवाड कश्यप खान विशाल नाटकर करण मोहिते महेंद्र धोत्रे कचराबाई कांबळे सचिन वाहुळ भगवान अवसारे नसीर सय्यद रितेश कांबळे अमोल कारके अल्ताफ शेख कौशल्या मोरे दीक्षा हातागळे महानंदा जाधव चंपाबाई साळवे सत्तूबाई भास्कर साळवे भास्कर साळवे केशव देशमुख भास्कर घुगे दीपक जिंदाल बाबूलाल शहा ताराबाई महेर शाहूबाई आठवे प्रयाग खंडागळे शोभा खंडागळे चिमणा खंडागळे कुणाल खंडागळे सुलाबाई जाधव करण कोयते या लोकांच्या निवेदनावर सह्या

Share This Article
error: Content is protected !!