हिमायतनगर प्रतिनिधी/ बाबाराव जरगेवाड
हिमायतनगर -पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्या नेतृत्वात आगामी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने व रमजान ईद व श्री परमेश्वर यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्याने पोलीस रूट मार्च काढून शहरातील नागरिकांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले
याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी हिमायतनगर पोलीस स्थानकाकडून शहरातील मुख्य रस्त्याने आज दिनांक 16 मार्च रोजी पोलीस रूट मार्च काढण्यात आला त्या रूट मार्चमध्ये चार पोलीस अधिकारी, तेरा पोलीस अंमलदार आणि सी.आर.पी.एफचे 51 जवान व सर्व होमगार्डचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शहरातील मुख्य रस्त्याने हा रूट मार्च काढण्यात आला होता..