‘कन्यादान योजना’ काय आहे…?
मुंबई – लग्न सोहळा म्हटला की अलीकडे साखरपुडा, प्री वेडिंगपासून ते हळद, मेहेंदी, लग्न, रिसेप्शन, पूजा, गोंधळ, आणि पुढच्या कितीतरी गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चाचा डोंगर डोळ्यासमोर उभा राहतो. नाही म्हणायला अलीकडे अनेक कुटुंब याबाबत जागृत झाली असल्याने खर्च ५०-५० टक्के वाटूनही घेतला जातो. पण तरीही समोर येणारा खर्चाचा आकडा प्रत्येकाला परवडेलच असे नसते. लग्नासारखा आनंदी क्षण हा कुण्या कुटुंबाला भार वाटू नये यासाठी महाराष्ट्र सरकारची ‘कन्यादान योजना’ खास ठरते.