आलापल्ली शहर प्रतिनिधी: शंकर मुत्येलवार
आलापल्ली – महिला बचत गट व लोकमत महिला सखी अंतर्गतजागतिक महिला दिनानिमित्त गोड मोहल्ला आलापल्ली येथे कार्यक्रमाचे आयोजन तिवाडे यांच्या भव्य पटांगणात करण्यात आले .या प्रसंगी भारत माता राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केलं तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद माजी अध्यक्ष गडचिरोली तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेटचे सदस्य सौ. भाग्यश्रीताई ऋतुराज हलगेकर (कु. भाग्यश्री ताई धर्मराव बाबा आत्राम) तसेच प्रमुख अतिथी म्हणून आलापल्ली ग्रामपंचायत माजी उपसरपंच सौ. पुष्पाताई रमेश अलोणे गुप्ता मॅडम ग्रामपंचायत माझी सदस्य सौ. जिजाबाई शंकरराव चिकटे सौ. संगीता ताई बुरांडे सौ. राणी गणेश आडगोफुलवार सौ. बारसकर ताई मंचावर उपस्थित होत्या.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ .भाग्यश्रीताई ऋतुराज हलगेकर (कुमारी भाग्यश्री ताई धर्मराव बाबा आत्राम) आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले पाहिजे आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने काम करत आहेत अशा महिलांना माझा मानाचा मुजरा असे एकही क्षेत्र नाही ज्यात महिलां नाही जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना खूप खूप शुभेच्छा दिल्या. महिला बचत गट व लोकमत महिला सखी मंचातर्फे सर्व महिलांसाठी सुंदर असं जेवणाचा आयोजन करण्यात आले व .सांस्कृतिक कार्यक्रम गीत नृत्य आणि समूह नृत्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक कुमारी प्रणाली राहुल दुर्गे सौ .माया विनोद खांडेकर सौ. मीना दीपक बोंडे सौ.सुनिता शंकर मुत्येलवार सौ .वैशाली जयराम गेडाम सौ. गौतमी दहागावकर सौ. श्रीमती सिमरन गाजरलावार सौ. सुधा संजय तिवाडे अरुणा साई विलास तोराम सौ. मंगलाताई कुचनवार सौ. शकुंतला शंकरराव कोडलेकर सौ. संगीता विजय दिकोंडावार सौ शालू अनिल इसकापे कमला सांगामवार सौ. सपना पराग कुचनवार सौ सोनी सोलंकी सौ मनीषा विजय दि कोंडावार कार्यक्रमचे संचालन सौ. माया विनोद खांडेकर यांनी केले. आभार सौ .प्रणाली राहुल दुर्गे यांनी मांनले कार्यक्रमाला उपस्थिती आलापल्ली नगरातील सर्व बचत गटातील महिला उपस्थित होते.