नांदेड जिल्ह्यात कुस्ती साठी प्रसिद्ध असणाऱ्या देवाची बोरगडी आता शासकीय कर्मचाऱ्यांची बोरगडी म्हणून प्रसिद्ध होतांना दिसत आहे.

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

6 महिन्यात 7 जण शासकीय सेवेत रुजू….

हिमायतनगर प्रतिनिधी/ लक्ष्मण भैरेवाड

हिमायतनगर : तालुक्यातील पंचक्रोशीत नावाजलेले कुस्ती साठी नावलौकिक असलेली श्री क्षेत्र बोरगडी येथील मुलाची शासकीय सेवेमध्ये विविध क्षेत्रांमध्ये भरारी घेतांना दिसत आहे. आजच्या स्पर्धेच्या काळात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून लाखो मुले मुली शासकिय नोकरीचे स्वप्न मनाशी बाळगून आपल्या परिवाराचे व आपल्या गावाचे नाव मोठं करण्यासाठी तयारी करीत असतात पण नोकरी लागणे हे आजच्या काळात सोपे राहिलेलं नाही कारण एका जागेसाठी हजारो मुलांना मागे टाकावे लागते आणि ही काही सोपी गोष्ट नसते त्यात आपली सर्व सामान्य शेतकरी कुुंबातील हालाखीची परीस्थिती असतानाही मनाशी जिद्द चिकाटी आणि संयम बाळगून तयारी करावी लागते ….
या एवढ्या मोठ्या प्रचंड अशा अवघड स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या mpsc द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत श्री क्षेत्र बोरगडी येतील सचिन माधवराव काईतवाड यांची मंत्रालय लिपीक मानून निवड झाली आहे… समस्त गावकरी मोठ्या आनंदाने सत्कार केला आहे, सचिन माधवराव काईतवाड यांच्या यशाने बोरगडी या गावची नाव पंचक्रोशीत अजून एकदा गाजले आहे कारण एकच वर्षामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल सात ते आठ विद्यार्थी शासकिय सेवेत दाखल झाले आहेत ही फार उल्लेखनीय गोष्ट आहे. नांदेड जिल्ह्यात कुस्ती साठी प्रसिद्ध असणाऱ्या देवाची बोरगडी आता शासकीय कर्मचाऱ्यांची बोरगडी म्हणून प्रसिद्ध होतांना दिसत आहे.

चंद्रकांत नागुलवाड हे दारू बंदी psi,
विठल यनगुलवार नांदेड पोलीस,
सचिन काईतवाड लिपिक मंत्रालय,
भरत शेनेवाड ठाणे पोलीस,
अंकुश राठोड अकोला पोलीस,
श्रीकांत काईतवाड मेकॅनिकल रेल्वे खाते,
आकाश जाधव अकोला पोलीस,
किरण जाधव नागपूर पोलिस, 7 महिन्यात 6 जणांची निवड झाली आहे.बोरगडी येथील व अनेक विद्यार्थी नांदेड, पुणे,मुंबई, येथे उराशी शासकिय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून तयारी करीत आहेत त्यांनीही खचून न जाता जोमाने तयारी करावी आणि आपले स्वप्न व गावाचे नाव आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेचे नाव अजून मोठे करतील कारण या शाळेतील शिक्षकांनी यांना घडविण्यात मोठा सिंहाचा वाटा आहे कारण प्रत्येक मुलगा हा निर्व्यसनी आहे ही बाब विशेष आहे आशी समस्त गावकऱ्यांचे म्हणणे आहे….


मनःपूर्वक अभिनंदन शासकीय सेवेत निवड झाल्या बद्दल…. तुमच्या मुळे समाजाचे तसेच आपल्या गांवाचे सगळीकडे कौतुक होत आहे,बोरगडी हे गांव महाराष्ट्रात प्रसिद्ध होतांना दिसत आहे…. समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे… तुमच्या या कर्तृत्वामुळे मुला मुलींना एक प्रेरणा, दिशा आणि विश्वास निर्माण होवील, तुम्ही रात्र आणि दिवस घेतलेली मेहनत मी जवळून नांदेड येथे पाहिली आहे..स्वतःच्या अस्तित्वासाठी, समाजासाठी नाव पण उंचीवर नेण्याचे काम केले आहे…. कष्टाच चीज करूंन दाखवलं… भगवान श्रीकृष्ण यांच्या आशीर्वादाने समोर पण अशीच कामगीरी होईल .

भुमन्नाजी अक्केमवाड भोशीकर

प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र गोल्ला गोलेवार यादव महासंघ

 

Share This Article
error: Content is protected !!