वंचित च्या वतीने जिल्हाधिकारी यांना आंदोलन करण्या संबधी चे निवेदन….

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड प्रतिनिधी/अशोक वाघमारे

नांदेड – महाराष्ट्र शासनाने शिक्षणाचा अधिकार (RTE) या कायद्याअंतर्गत बदल केला असुन यामध्ये एक किलोमीटर परिसरातील शासकीय अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही असे पत्रक काढले आहे. त्यांच्या या जाचक अटी संदर्भात वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिणच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार असल्याचे निवेदनात सांगितले आहे.

महाराष्ट्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क ( वंचित व दूर्बल गटातील बालकांचे इयत्ता १ ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी २५ टक्के प्रवेश करण्याची पध्दत) नियम, २०१३ नुसार वंचित व दूर्बल घटकातील अशी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही. असा अन्यायकारक निर्णय या शासनाने घेतला आहे. या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिणच्या वतीने युवा प्रदेश सदस्य अक्षयजी बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १८ मार्च २०२४ रोजी सकाळी ११:०० वा.जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार आहे…. यावेळी जिल्हाध्यक्ष धिरज हाके, जिल्हा महासचिव ॲड.वैभव लष्करे, जिल्हा उपाध्यक्ष दिपक गजभारे, घुंगराळेकर ,महानगराध्यक्ष गोपाल सिंग टाक, जिल्हा सचिव बालाजी गायकवाड, जिल्हा महासचिव, शुध्दोधन कापसीकर इत्यादीच्या सहीने निवेदन दिले असुन त्यावेळी त्यांनी या सर्वांच्या उपस्थितीत आंदोलन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे…..

Share This Article
error: Content is protected !!