नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव – कुंटुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे बरबडा परिसरात नेहमीच मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने रेती उपसा होत असते. शुक्रवार दुपारी वाळू उपसा करत असलेल्या रेती माफियांवर तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने कारवाई केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई बरबडा परिसरातील अंतरगाव या ठिकाणी करण्यात आली. यावेळी रेती उपसा करणाऱ्यांसाठी वापर करणाऱ्या ट्रॅक्टर वर गुडगुडी पोलीस ठाण्यात साहित्य जप्त करण्यात आले आहे.
बरबडा परिसरात अंतरगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातातुन दिवसा ढवळ्या अवैध रेती उत्खनन सुरू होते. या ठिकाणीही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करण्यात आली. येथे अवैधरित्या रात्री व दिवसा बेसुमारास गुडगुडीच्या साह्याने रेती उपसा केला जात होता. शेकडो ब्रास रेती काढण्यात आलेली रेती रातोरात हलविली जात आहे. रेती उपसा करणारे ट्रॅक्टर गुडगुडी सह्यने पाण्यात मध्यभागी रेती काढली जाते होती त्याची माहिती नायगाव तहसीलदारांना मिळताच मंडळ अधिकारी स्वामी एस पी , व तलाठी डाकेवाड ,कोतवाल हास्सेवाड पोलीस कर्मचारी पथकासह धाड टाकली. ट्रॅक्टर मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे माहिती दिली आहे.