नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – निवडणूक आयोगाने देशातील सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा दि.१६ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करून आदर्श आचारसंहिता लागू केली असुन त्या अनुषंगाने लातुर लोकसभेतील लोहा विधानसभा सभा क्षेत्रातील आदर्श आचारसंहिता संदर्भात राजकीय पक्षाची दि . १७ मार्च लोहा तहसिल कार्यालयात बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी सांगितले की,लोकसभा निवडणुकीची प्रशासनाने जय्यत तयारी केली असुन आदर्श आचारसंहिताचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे.
लोहा विधानसभा क्षेत्र हे लातुर लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात असुन लोहा विधानसभा क्षेत्रात ३३० मतदान केन्द्र आहेत.
लोहा मतदार संघात एकुण २ लाख ९२ हजार ५८५ मतदार आहेत.यात पुरुष मतदार १ लाख ५१ हजार ३१३ आहेत तर स्त्री मतदार १ लाख ४१ हजार २६६आहेत तर तृतीय पंथी ६ मतदार आहेत.
तसेच दिव्यांग २४१४ आहेत.
यात संवेदनशील मतदान केन्द्र ३आहेत.नांदगाव,कांजाळा,कदमाचीवाडी.
आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ५ पोलिस स्टेशनचे ५ पथके स्थापन करण्यात आले आहेत यात सोनखेड, उस्माननगर,माळाकोळी,लोहा, कंधार हे पोलीस स्टेशन असुन तिथे तक्रारीचे निवारण करण्यात येईल.राजकीय पक्षांनी सार्वजनिक मालमत्ता ,महामंडळे आदी ठिकाणी असलेले बॅनर पोस्टर काढून घ्यावी खाजगी घरावरचे बॅनर झाकुन घ्यावे. एखाद्या खाजगी व्यक्तीला तिच्या परवानगीने व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या परवानगीने लावता आहे.
निवडणूक प्रचारासाठी मंदिर, मस्जिद, गुरुदारा आदी धार्मिक स्थळाचा वापर करता येणार नाही. कुठली ही मिरवणूक, सभा रॅली यांची परवानगी आवश्यक आहे ती सर्व आॅनलाईन आहे.प्रचारासाठी जी वाहने वापरता त्या वाहनाचा परवाना असला पाहिजे व त्यांनी निवडणूक आयोगाकडून परवानगी घ्यावी.
शासकीय विश्रामगृहाचा वापर कुणालाही करता येणार नाही.
फक्त निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांना वापरता येईल व सरकार मधील मंत्री यांना फक्त येथे येऊन फ्रेश होता येईल व जेवण करता येईल पण विश्रांती घेता येणार नाही.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी झेंडा,बॅनर लावणे यासाठी परवानगी घ्यावी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी परवानगी घ्यावी.मुद्रक व प्रकाशक यांची दर्शनी नावे व त्यांनी किती प्रति काढल्यात ते टाकावे अन्यथा १९२७(क) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.
तसेच वाहन तपासणी केंद्र हे अंतर जिल्हा सीमेवर असणार असुन यात माळेगाव, सुभाषनगर,लोहा,पेनुर,किवळा येथे राहणार आहेत.
स्टागरुम लोहा तहसिलच्या वरच्या सभागृहात असणार आहे.
आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राजकीय पक्ष व प्रिंटिंग प्रेस यांनी बॅनर छापल्यावर खर्च दाखल करावा.
आदर्श आचारसंहितेसाठी काल प्रशासनाची बैठक झाली व सर्व अधिकारी, कर्मचारी यांना सुचना देण्यात आल्या आहेत.
येथील उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून गोसावी यांनी पदभार घेतला आहे.
दारुबंदी,हद्दपार,अवैध वाहतूक आदींवर लक्ष ठेवण्यात येईल.
इफ्तार पार्टी उमेदवारांनी दिली असेल तर त्यांचा निवडणूक खर्चात हिशोब द्यावा लागेल व त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल.
तसेच नवीन कामांना सुरुवात करता येणार नाही उद्घाटन करता येणार नाही ज्याचे वर्क ऑर्डर दिली असेल ते कामे चालू असतील तसेच शासनाच्या योजना चालू राहतील.
लातुर लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार असून यात अधिसूचना दि.१२ एप्रिल २०२४ रोजी जाहीर होईल . नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक १९ एप्रिल २०२४ तर नामनिर्देशनपत्राची छाननी २० एप्रिल रोजी होईल . उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दि.२२ एप्रिल २०२४ असुन प्रत्यक्ष मतदानाचा दि. ७ मे २०२४ असुन मतमोजणीचा दि. ४ जुन आहे.
तेव्हा सर्वांशी आदर्श आचारसंहिताचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी केले आहे.
यावेळी नायब तहसीलदार अशोक मोकले,नायब तहसीलदार संजय भोसीकर, नायब तहसीलदार अनिल परळीकर,ई.डी.जोंगदंड,राजश्री जोंधळे यांच्या सहित राजकीय पक्षाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.