सेवानिवृत्त अभियंता गायकवाड यांच्या घरासमोर नालीचे साम्राज्य..
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – येथील नाईक नगर परिसरातील राजीव गांधी कॉलेजच्या मागे नागरी समस्यांनी थैमान घातल्या असून सार्वजनिक नालीचे पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या आरोग्याची मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झाली आहे..
महाराष्ट्र शासनाच्या शासकीय सेवेत संपूर्ण हयात घातलेल्या सेवानिवृत्त अभियंता असलेल्या गायकवाड यांच्या घराभोवताल सार्वजनिक नालीचे सांडपाणी बाहेर येऊन घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे गायकवाड कुटुंबीय नव्हे तर आजूबाजूच्या कुटुंबियांवरही आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या नालीच्या प्रश्नासंदर्भात गायकवाड कुटुंबीयांचे वतीने प्रशासन तसेच महापालिकेच्या दरबारात अनेक वेळा निवेदने ईमेल तसेच प्रत्यक्षात थेटे मारूनही कुठलेही यंत्रणा हल्ली नसल्याचे मत श्री जितेंद्र गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले
त्यांनी पुढे सांगितले की एकीकडे नागरिकांसमोर विकासाचे चित्र रंगविले जाते आणि दुसरीकडे भलते चित्र समोर येत असून एकेकाळी सुस्थितीत असलेला राजीव गांधी कॉलेजच्या पाठीमागील नाईक नगरचा हा रस्ता प्रशासन तसेच स्थानिक रहिवाशांच्या काही आडमुठे धोरणामुळे आज समस्यांच्या विळख्यात सापडला आहे तरी महापालिका प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आदींनी या संदर्भात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशी निर्वाणीची मागणी गायकवाड कुटुंबीयांनी केली आहे…