नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
नांदेड – जिल्यातील मुखेड तालुक्या मधील मौजे बेटमोगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास बेटमोगरा सह परिसरातील साधारणतः सात ते आठ गावांचा संपर्क असून सद्यस्थितीत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अत्यंत दुरावस्था झाली असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे चालत आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या दोन्ही महीला वैद्यकीय अधिकारी १) डॉ.वर्षा भोरे तर दुसरे डॉ.ऐश्वर्या देगलूरकर हे अनेकदा गैरहजर राहत असतात,तर अधून मधून कधी स्वमर्जिने कभी भी आओ और कभी भी निकल जाओ अशी यांची परिस्थिती आहे.
दि.१५ मार्च रोजी सकाळी आकरा वाजता च्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते तथा निर्भीड पत्रकार भारत सोनकांबळे यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची वास्तविक स्थिती जाणून घेतली असता येथील कर्तव्यावर रुजू असलेले महीला वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले.मात्र या प्रसंगी प्रा.आ.केंद्रात रुग्णांची तपासणी करण्यासाठी वर्दळ जास्त प्रमाणात होती.यावेळी उपस्थित रुग्णांची मात्र हेळसांड झाल्याचे आढळून आले.येथील वैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर तर बहुतांश वेळा मनमानी पणे कधी ही यायचं कधी पण निघून जायचं मग अशा परिस्थितीत गोर- गरीब सर्वसामान्य नागरिकांनी कुठे जायचं ? असा प्रश्न परिसरातील नागरिकांसमोर उपस्थित होत आहे.
अनेक रुग्ण तपासणी करण्यासाठी प्रा. आ. केंद्रात येतात माञ वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) दैनंदिन वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे रुग्णांना आल्यापावली परत खासगी रूग्णालयात धाव घ्यावी लागते व गोर गरीब,सर्वसामान्य,शेतमजूर नागरिकांना अशावेळी आर्थिक भुर्दंड बसतो. बेटमोगरा प्रा.आ.केंद्राकडे वरीष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी उपस्थीती हजेरीपटावर सह्या करुन प्रा.आ.केंद्राच्या दैनंदिन वेळेच्या अगोदरच घरी निघुन जातात. प्राथमिक आरोग्य केंद्र मौजे बेटमोगरा येथील वैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहत असल्यामुळे त्यांच्या कार्य प्रणालीला ग्रामस्थ वैतागले असून तात्काळ त्या कामचुकार अधिकारी यांची येथून बदली करून येथे नूतन वैद्यकीय अधिकारी द्यावेत अन्यथा प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळा ठोको आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा पावित्रा.ओ.पी.डी चे कामकाज हे सेवक, ए.एन.एम.वरच भागवल्या जात असल्यामुळे बेटमोगरा परिसरातील गंभीर रुग्णांची हेळसांड मोठ्या प्रमाणात होत आहे.अशा वैद्यकिय अधिकारऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे, याकडे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे,
अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून होत आहे.संबंधित प्रशासनाने या बाबीकडे जातीने लक्ष देऊन गोरगरीब कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक,शेतमजुर जनतेला न्याय द्यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून ग्रामस्थांच्यासमवेत प्रा.आ.केंद्रास टाळा ठोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका उपाध्यक्ष पत्रकार भारत सोनकांबळे यांनी तालूका आरोग्य अधिकारी मुखेड यांना दि.१८ मार्च २०२४ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.