नांदेड प्रतिनिधी/अशोक वाघमारे )
नांदेड- नायगाव तालुक्यातील शेळगाव छत्री ते कोठाळा रस्त्याचे काम चालू झाले असून ते रातोरात निकृष्ट दर्जाचे करत असल्यामुळे सुजले गावच्या सरपंच दत्ता आईलवारसह ग्रामस्थांनी रस्ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला तर दुसरीकडे बेशिस्त वर्तन करणाऱ्या रस्ते इंजिनिअर यांना ठेवले डांबून गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे काम गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या संगणमताने रातोरात निकृष्ट दर्जाचे काम करून बिल लाटण्याचा प्रयत्न करत असताना सुजले गावच्या ग्रामस्थांनी व सरपंचांनी त्यांना पूर्व सूचना दिली रस्त्याचे काम हे वेळोवेळी होत नसतात 15 कोटी चे काम असल्याने सिस्टिमेट प्रमाणे काम व्हावं व मजबूत रस्ता व्हावा यासाठी संबंधित गुत्तेदारांना सूचना देऊनही गुत्तेदार रातोरात निकृष्ट दर्जाचे काम करताना गावकऱ्यांनी पाहिले व लगेच गावचे सरपंच तथा ग्रामस्थ रस्त्यावर चालत असलेल निकृष्ट दर्जाचेकाम त्वरित थांबलेले व संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घातला व रस्त्यावरील यांना दाबून ठेवले यामुळे अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली तर नंतर संबंधित विभागाचे अधिकारी येऊन यावर तोडगा काढला हा रस्ता उत्कृष्ट दर्जाचा करावा व इस्टिमेट प्रमाणे काम करावे अन्यथा काम करू दिले जाणार नाही अशी ग्रामस्थांची मागणी होती. तदनंतर रस्ते बांधकाम विभागाचे अधिकारी लेखी लिहून दिले रस्ता हा इस्टिमेट प्रमाणे तयार करून दिला जाईल असे लेखी ग्रामस्थांना लिहून दिले