नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – भारतात सट्टा लावणे बेकायदेशीर आहे.मात्र,तरीदेखील भारतात छुप्या पद्धतीने सट्टेबाजारात सट्टेखोर सट्टा लावतात.अनेकदा याविरोधात पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई देखील केली जाते.
नांदेड जिल्हात अनेक बाजारपेठा म्हणून परिचित असतांना आता मोठे जुगार पेठ म्हणून नांदेड जिल्ह्याचे नाव उदयास येत आहे.जिल्यातील सर्वच तालुक्यात मोठे मायाजाल एजेंट मार्फत उभे केले आहे.औरा 24 अँप, पार्कबेट आणि साई अँपचे आय.डी एजेंटला देवून सट्टा मोठ्या प्रमाणात जोरात चालू असल्याचे प्राथमिक चित्र पुढे येतांना दिसत आहे.तरुण मुलांना मोठ्या टक्केवारीचे आमिष दाखवून सट्टेबाज आपल्या जाळ्यात तरुण मुलांना ओडून येत आपल्या काळ्या धंद्याचे भागीदार बनवित आहे. सट्टा घेणारे मालामाल तर खेळणारे कंगाल कर्जबाजारी होत असल्यामुळे पालकवर्गात चिंता पसरली आहे.
आपला मुलगा तर या माया जाल मध्ये अडकला तर नाही ना चर्चा पालक वर्गात होतांना दिसत आहे.विद्यमान औरा 24 आणि साई बेटिंग अँप हे अवैध पद्धतीने चालू आहे.हे दोन्ही अँप टॅक्स पियर नाहीत.तरीही यावर अद्याप पर्यंत ही कोणतीच ठोस कार्यवाही झाली नाही या मागचे गौडबंगाल काय आहे स्पष्टपणे दिसून येते नाही.
औरा 24 अँप साई अँपचे मालकांच्या धर्माबाद ते गुजरात,तेलंगणा, आंध्रप्रदेश,गोवा,राज्यस्थान येथील ऑनलाईन बेटिंग सट्टेबाजांसोबत संबंध असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.सट्टेबाज मालकांवर तात्काळ ई.डी.सी.आय.डी.मार्फत कार्यवाही व्हावी यासाठी अनेकांनी तक्रारी केल्या असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले आहे.
जिल्यातील सर्वच तालुक्यात गुड गुडी,मटका, जुगार,तरुणाईला जास्तीच्या टक्केवारीचे आमिष दाखवून कर्ज बाजरीच्या खाई लोटणाऱ्या सट्टेबाजांवर कार्यवाईचा फास कधी आवळणार आहात असा प्रश्न सुजाण नागरिक विचार आहे.उच्च विद्या विभूषित गर्भ श्रीमंत नगरी ते गरीब नगरी पर्यंत यांचे एजेंट सर्वत्र पसरलेले आहेत.अश्या अनेक प्रकरणात चोराला सोडून संन्याशाला शिक्षा झाली आहे.