नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
नांदेड – जिल्हा काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गंगाधर सोनकांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेशाध्यक्ष डॉक्टर दीपा चक्रवर्ती यांना दिला माहितीस्तव नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष व दक्षिण जिल्हाध्यक्ष यांनाही माझ्या खाजगी घरगुती अडचणीमुळे हा राजीनामा देत आहे असे कळविले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेब त्याने काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर नांदेडच्या काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांचे राजीनामा सत्र जिल्ह्यात चालूच आहे माननीय अशोकराव चव्हाण यांचे डॉक्टर सोनकांबळे हे विश्वासू व निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते साहेबांनी काँग्रेस सोडल्यामुळे जिल्हाध्यक्ष नागेलीकर पवार पांडागळे डॉक्टर सोनकांबळे हे काँग्रेसमध्ये उपेक्षित होते या दैनिक प्रजावणीच्या बातमीच्या अनुषंगाने *जाये तो जाये कहा….. भाजपा जमेना आणि काँग्रेसमध्येही साईडलाईन*
यामुळे काँग्रेस मधील पदाधिकारी व कार्यकर्ते सैरावैर झालेले दिसून येत आहेत काँग्रेसला नांदेड जिल्ह्यात सक्षम नेतृत्व नसल्यामुळे उपेक्षित असलेले डॉक्टर गंगाधर सोनकांबळे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा पक्षश्रेष्ठीकडे राजीनामा दिला आहे डॉक्टर सोनकांबळे यांनी आपल्या कार्यकाळात सक्षम व कर्तुत्ववान कार्यकर्त्यांची फळी तयार करून काँग्रेस पक्षात सामाजिक न्याय विभागाचा प्रभाव तयार केला होता.
पण सध्याच्या प्रभारी जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसमध्ये मरगळ निर्माण केली कोणाचा पायपुस कोणाला लागेना काँग्रेसमध्ये पूर्वीसारखी शिस्त दिसत नाही डॉक्टर सोनकांबळे हे आदर्श हेडमास्टर असल्यामुळे त्यांचे काँग्रेसमध्ये मन रमत नाही म्हणून त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहेत यांच्याबरोबर त्यांची जिल्हा कार्यकारिणी सुद्धा जिल्हाध्यक्षाकडे राजीनामा दिले सोळा तालुका अध्यक्ष पैकी 13 तालुका अध्यक्षांनी सुद्धा राजीनामा दिले म्हणून जिल्हाध्यक्षांनी आपली जिल्हा कार्यकारणी बरखास्त करून आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. असे डॉक्टर गंगाधर सोनकांबळे माजी जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय..विभाग नांदेड.यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले आहे.