डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराच्या मानधनात वाढ करा..संविधान हक्क परिषद

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड : महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागाच्या वतीने वंचीत समाजाच्या उत्थानासाठी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दर वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. दि. १२ मार्च २०२४ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.सन्मान चिन्ह आणि १५ हजार रुपये मानधन राशी देऊन पुरस्कर्त्याना सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून समाजकल्याण अधिकार्‍यानी पात्र लाभार्थ्यांना शासकीय खर्चाने मुंबई येथे घेउन जाण्याची व्यवस्था केली होती.

 मुंबईस जाण्यापूर्वी सर्वांना जिल्ह्याच्या समाजकल्यान विभागातर्फे भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन पुरस्कार वितरण सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते.ही वार्ता ऐकुन लाभार्थी सुध्दा पुरस्कार रुपाने मोठी धन राशी मिळेल या आनंदात होते.परंतु शासनाने सन्मानचिन्ह आणि फक्त १५ हजार ऐवढे अल्प मानधन दिल्यामुळे लाभार्थ्यांचे चेहरे पाहण्या सारखे झाले होते.राजा उध्दार झाला अन् हाती भोपळा दिला अशीच खंत सर्वांनी व्यक्त केली होती.

संविधान हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष भि.ना. गायकवाड आणि कोषाध्यक्ष किशनराव रावणगावकर यांनी दि.२१ मार्च २०२४ रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देउन पुढील वर्षी देण्यात येणार्‍या पुरस्कार मानधन राशी मध्ये वाढ करुन रुपये एक लाख एवढे मानधन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

 राज्याची आर्थिक परिस्थिती नाजुक असेल तर हा पुरस्कारच बंद करण्यात यावा निदान ३०/४० वर्ष चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना १५ रुपये एवढे नगण्य मानधन देऊन त्यांची कुचंबना तरी होणार नाही अशी विनंती करण्यात आली आहे.यावर शासन काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Share This Article
error: Content is protected !!