विजयालक्ष्मी स्वामी व नागोराव तिप्पलवाड यांना पुरस्कार जाहीर

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड प्रतिनिधी /अशोक वाघमारे 

नांदेड :– डॉ नारायणराव भालेराव हायस्कूल,स्नेह नगर,नांदेड येथील शिक्षिका विजयालक्ष्मी मारोती स्वामी यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे व जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा येथील स्काऊट शिक्षक नागोराव मारोती तिप्पलवाड यांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांच्या निवडीचे पत्र अध्यक्ष शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांनी नुकतेच पाठविले आहे. हा पुरस्कार दिनांक 29 मार्च 2024 रोजी श्रीराम साधना आश्रम,रामनगर मुकिंदपूर नेवासा फाटा तालुका नेवासा येथे विशेष मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.त्यांच्या या पुरस्कार निवडीबद्दल मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव व सर्व पदाधिकारी यांनी व शिक्षक व मित्र मंडळी यांनी अभिनंदन केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!