औरंगाबाद – आंतरवालीत मनोज जरांगेंनी आज बोलावली बैठक, निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी घोषणा होणार? आजच्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहेत. सोबतच मनोज जरांगे आज कोणती भूमिका मांडणार हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटीत मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतेले जाणार आहेत. सोबतच, 900 एकरवर लवकरच मराठा समाजाची सभा होणार असून, ती सभा कुठे आणि कधी होणार याची देखील घोषणा आजच्या बैठकीत केली जाणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहेत. सोबतच मनोज जरांगे आज कोणती भूमिका मांडणार हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.