माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या धाडसी भूमिकेचे धर्माबादसह नायगाव विधानसभा मतदारसंघात कौतुक!

abhishek bakkewad
5 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे आणि आज घडीला अशोकराव चव्हाण हे भाजपा मध्ये गेले असले तरी काँग्रेसची साथ न सोडणारे नायगाव विधानसभेचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी आता थेट नांदेड लोकसभा निवडणूक-२०२४ लढवण्याचे ठरवल्यामुळे आणि पक्षाने त्यांना कालच तिकीट देत क्लीन चीट दिल्यामुळे त्यांच्या या धाडसी भूमिकेचे धर्माबाद तालुक्यासह अख्या नायगाव विधानसभा मतदारसंघात कौतुक होत आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षांकडून निवडणूक लढवणारे आमदार वसंतराव चव्हाण यांना पराभवाचा मोठा धक्का बसला होता. यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे राजेश पवार यांनी तब्बल एक लाख १७ हजार ७५० मते घेत ५४ हजार३८४ मताची आघाडी घेत आणि नायगाव मतदार संघातून ५६.७% मतदान घेत विक्रमी विजय मिळवला होता.तर माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना ६३ हजार ३६६ मते म्हणजेच ३०.१७%मते मिळाली होती. तर प्रसिद्ध उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांना २३ हजार पाच मतावर व जवळपास ११% मतदानावर समाधान मानावे लागले होते.

आमदार राजेश पवार हे २०१९च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर विकास निधीचा प्रचंड पाऊस पाडत आहेत व कामे निकष पूर्ण व्हावीत यासाठी टक्केवारी न घेता व कुणालाही घेऊ न देता गुत्तेदाराला कडक शब्दात ताकीद देत कामाच्या गुणवत्ते संदर्भात कुठलीही तडजोड करणार नाही असा गर्भित इशारा देत असल्यामुळे आज घडीला धर्माबाद तालुक्यासह अख्या नायगाव मतदार संघात साठ वर्षाच्या काळात जो विकास साधला गेला नाही तो आज घडीला शीघ्र गतीने होत असल्यामुळे प्रत्येक गावात आमदार राजेश पवार हे नाव मोठ्या आदराने घेतल्या जात आहे. असे असतानाही माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी थेट नांदेड लोकसभा निवडणूक लढवायचा धाडसी निर्णय घेत अनेकांना त्यातल्या त्यात कट्टर काँग्रेस पंथीयांना विचार करण्यास भाग पाडले आहे.

२०१९ची नांदेड लोकसभा निवडणूक म्हणजे एक आश्चर्याचा धक्का होता! या निवडणुकीत विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी थेट राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पराभव केला.

 त्यामुळे आज घडीला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नांदेडचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर व वसंतराव पाटील चव्हाण अशी सरळ लढत नांदेड लोकसभा निवडणुकीत भविष्यात पाहायला मिळते की या दोघात तिसरा सक्षम उमेदवार उभा टाकून दोघांच्याही अस्तित्वाला धक्का पोहोचण्याचे काम करतो हे येणारा काळच जरी सांगणार असला तरी आज घडीला वसंतराव चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून प्रचार यंत्रणेत यशस्वी होतील का? हा महत्त्वाचा प्रश्न जाणकार बोलून दाखवत असून महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघाच्या ४८ जागा पैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असणारा नांदेड लोकसभा मतदारसंघ आहे.

या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असण्यामध्ये भोकर विधानसभा मतदारसंघ यामध्ये अर्धापूर व मुदखेड तालुका येतो तर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात नांदेड शहरी,नांदेड ग्रामीण, आणि लिंबगाव महसूल मंडळाचा याच्यात समावेश असून नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे वार्ड क्रमांक १ते ९, २८ते ३९आणि ५०ते ५८ असे वार्ड येतात.तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये लोहा तालुक्यातील सोनखेड महसूल मंडळाच्या समावेशा बरोबरच नांदेड तालुक्यातील तुप्पा आणि विष्णुपुरी महसूल मंडळाचा समावेश असून नांदेड वाघाळा महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक १० ते २७, ४० ते ४९, ५९ ते ६५ या वार्डांचा समावेश होतो.

तर नायगाव विधानसभा मतदारसंघात उमरी व धर्माबाद तालुके समाविष्ट होतात तर देगलूर विधानसभा मतदारसंघात बिलोली तालुक्याचा समावेश आहे.

तद्वतच मुखेड विधानसभा मतदारसंघात कंधार तालुक्यातील पेठवडज व कुर्ला महसूल मंडळांचा समावेश आहे. एवढा मोठा विस्तार असलेल्या मतदार संघामध्ये माजी आमदार व नांदेड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण आपला प्रचार कसा करतील ही उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा फायदा प्रतापराव पाटील चिखलीकर यांना झाला होता.तसा फायदा आता भाजप विरोधी लाट निर्माण होऊन काँग्रेस बद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाली तर नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना होतो का हे येणारा निवडणूक निकालच स्पष्ट करेल.

उपरोक्त पार्श्वभूमीवर एक गोष्ट मात्र प्रांजळपणे चर्चिला जात असून ती म्हणजे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी नांदेड लोकसभा निवडणूक लढवण्याचे केलेले धाडस होय!

          *चौकट-*

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे सद्यस्थितीत भाजपात दाखल होत राज्यसभेची खासदारकी मिळवली असली तरी २०१९ च्या पराभवाची सल त्यांच्या मनात अजूनही धगधगत असल्यास नवल नसून नांदेड जिल्ह्यातील आपले अस्तित्व भविष्यातही आबाधीत ठेवण्यासाठी वसंतराव चव्हाण यांना छुपा पाठिंबा देत भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव करीत पुन्हा मधल्या दाराने वसंतराव चव्हाण यांना भाजपामध्ये घेत मंत्री पद मिळवून देत त्यांचे पुनर्वसन करण्यात आले तरी बदलत्या राजकीय समीकरणांनुसार कोणतेही नवल नसणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत असून सोशल मीडियावर मात्र प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाच वर्षाच्या कार्याचा पाढा व वसंतरावाच्या कार्याचा पाढा मात्र धडाक्यात वाचणे चालू आहे. *संजय कदम*

Share This Article
error: Content is protected !!