नांदेड प्रतिनिधी: गोविंद चिखलवाड
नांदेड – श्री. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड आदेशाने आगामी लोकसभा निवडणूक अनुषंगाने रेकॉर्डवरील पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेऊन अवैध धंद्यावर कारवाई करणे व संशयित हालचालीवर लक्ष ठेवणे करिता आदेशित केल्याप्रमाणे श्री. सुशीलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय इतवारा यांच्या मार्गदर्शन व सूचनेवरून उपविभागीय इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अमलदार पोना/अर्जुन मुंडे पोका/ चंद्रकांत स्वामी संतोष बेल्लुरोड श्रीरामे दासरे सायबर शाखेचे पोहेका/ राजू सिटीकर यांनी काल दिनांक 26/3/2024 रोजी 10:25 वा. सुमारास सिडको नांदेड परिसरातील कॅन्सर हॉस्पिटल च्या पाठीमागे जय हिंद पार्क येथे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून छापा टाकून आरोपी नामे सुशील मनोहर गावखोरे रा. कॅन्सर हॉस्पिटलच्या पाठीमागे जय हिंद पार्क सिडको नांदेड यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील विनापरवाना बेकायदेशीर बाळगलेले 01 गावठी पिस्टल 02 जिवंत काडतुस मिळून आल्याने ते जप्त केले आहेत यावरून पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गुन्हा नोंद क्रमांक 244/ 2024 कलम 3/25, 7/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोउपनी /श्री. बाबुराव चव्हाण करीत आहेत
सदर कारवाई बाबत मा.श्री. कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड ,मा.श्री .अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड व इतर वरिष्ठानी गुन्हे शोध पथक उपविभाग इतवारा यांचे कौतुक केले आहे.