सेनेच्या सहा खासदारांची कामगिरी असमाधानकारक;पर्यायी नावांची चाचपणी; हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आऊट सुमठाणकर इन?

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

 

माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी

माहूर : सेनेच्या सहा खासदारांच्या जागी
पर्यायी नावांची चाचपणी सुरू असल्याचं कळतंय.कारण, महायुतीच्या शेवटच्या सर्वेमध्ये या खासदारांची कामगिरी असमाधानकारक असल्याचं पुढं आलंय.लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये ही माहिती समोर आली आहे.गोडसे,गवळी,तुमाने,कीर्तिकर, मंडलिक या नावांसह हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा पत्ता कट केला जाऊन संभवतः याठिकाणी भाजपकडून रामदास पाटील सुमठाणकर यांचे नाव पर्याय म्हणून जवळपास निश्चित झाले असल्याचे सांगितले जात आहे.आज सायंकाळपर्यंत सर्व सहाही ठिकाणी पर्यायी नावं जाहीर करण्याची औपचारिक घोषणा महायुतीकडून केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या लोकसभा उमेदवारांच्या नावांची कुठे पहिली तर कुठे दुसरीसुद्धा यादी जाहीर करण्यात आली परंतु पक्षाचे तुकडे होऊन, बंडखोरी होऊन “एक दिल के टुकडे हजार हूए,कोई यहाँ गीरा कोई वहॉऺ गीरा!”अशी काहीशी विचित्र अवस्था झालेल्या राजकीय पक्षांची स्वत:ची एकात्मता धोक्यात आली आहे.पूर्वी पक्षाची विचारधारा घेऊन एकसंघ असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यात सत्तेची प्रचंड दुफळी माजली.एकाचे दोन घरं झालीत. अर्थातच मतांचं देखील विभाजन झाल.”कल चमन था आज एक सेहरा हुआ, देखते ही देखते ते क्या हुआ”!
अशी केविलवाणी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.त्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा व काहीसा काँग्रेसचा मजबूत गड समजला जातो.परंतू, २०१९ निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेकडून निवडून आलेल्या घरोबा बदलून सध्या शिंदे सेनेचे खासदार असलेल्या हेमंत पाटील यांच्या साठी २०२४ लोकसभा निवडणुक नेमकी दोन सेनेमुळे मतविभाजन वाढुन आपली राजकीय कारकीर्द पणाला लावणारी ठरत आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) कडून हिंगोली लोकसभेचे उमेदवार म्हणून नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.तर चर्चारंभापासून राजकीय विश्लेषक ते सर्वसामान्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी बाबत व्यक्त केलेला अंदाज अखेर खरं ठरणार असून, सेनेच्या सहा खासदारांची नांव ही डेंजर झोनमध्ये असल्याचे सांगितले जात होते.त्यांच्या जागी पर्यायी नावांची चाचपणी केली जात असून,पर्यायी नावांची घोषणा करुन उमेदवारी घोषित केली जाणार आहे.त्यात हेमंत गोडसे (नाशिक), भावना गवळी (यवतमाळ),कृपाल तुमाने(रामटेक), गजानन कीर्तिकर (मुंबई उत्तर-पश्चिम),संजय मंडलिक (कोल्हापूर) यासह हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या जागी भाजप पर्यायी उमेदवार देणार असल्याचे सांगितले जात आहे.भाजपाकडून इच्छुकांच्या यादीत आ.तानाजी मुटकुळे, डॉ.श्रीकांत पाटील,शाम भारती यासह अर्धाडझन नावे असली तरी जनमताचा विचार करता रामदास पाटील सुमठाणकर यांचे नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असल्याचे सांगितले जात असून,आज गुरुवारी २८रोजी महायुतीच्या जागा वाटपाच्या अंतीम बैठकीनंतर उमेदवारांच्या उर्वरीत नावांची अंतिम यादी औपचारिकपणे घोषित केली केली जाणार आहे.तीन वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देत त्या समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी झटत सर्वसामान्य जनतेच्या मनात स्थान निर्माण केलेला राजकारणातील उच्चशिक्षित आणि फ्रेश चेहरा म्हणून रामदास पाटील यांचे नाव अनेक दिवसांपासून सतत राजकीय चर्चेत आहे. त्यांनी लोकसभा मतदारसंघात चालविलेल्या परीपूर्ण तयारीच्या व भक्कम जनसंपर्काच्या कार्याकडे बघीतल्यास व शिंदे सेनेचे खासदार हेमंत पाटील यांची कामगिरी असमाधानकारक असल्याची धक्कादायक बाब ल़ोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये समोर आली आहे.त्या पार्श्वभूमीवर हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीला निवडणुक जिंकायची असेल तर पर्यायी उमेदवार म्हणून रामदास पाटील हे भाजपाचा या लोकसभेवर प्रथमच शिरकाव करून इतिहास घडवून विजयाचे शिल्पकार ठरु शकतात अशी जनभावना या मागासलेल्या अविकसित मतदारसंघातील राजकीय, विश्लेषक, जाणकार, सुशिक्षित तरुण व्यक्त करताना दिसून येतात.

 

Share This Article
error: Content is protected !!