नांदेड प्रतिनिधी /अशोक वाघमारे.
नांदेडच्या नायगाव शहरात नायगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली बैठकीत उपस्थित जनतेला संबोधित करत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट,व शिवसेना (उबाठा )गट, व महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार श्री वसंतराव चव्हाण यांनी म्हणाले की आम्ही राहिलेले जिल्ह्यातील सर्वच काँग्रेस कार्यकर्ते नेते व मतदार हे काँग्रेस पक्षांमध्येच राहून जनतेचा दरबारात जाऊन जनतेचे आशीर्वाद घेणार असल्याचे प्रतिपादन केले आहे. पुढे श्री चव्हाण यांनी म्हणाले की भाजपा हा धडाडीशाहीचा पक्ष आहे त्यांच्याकडे मोठी धनशक्ती आहे तर आमच्याकडे जनशक्ती आहे. ही होऊ घातलेली निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होणार आहे. म्हणून जिल्ह्यातील सर्व जनतेने मला आशीर्वाद देऊन देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवावं आणि जिल्ह्यातील सर्व सामान्य गोरगरीब शेतकरी यांची काम करण्याची संधी मला द्यावी असेही श्री चव्हाण यांनी म्हणाले
सदर बैठकीत श्री वसंतराव चव्हाण यांनी म्हणाले की भाजपा व केंद्र सरकारने देशात द्वेषचे राजकारण करून जातीय धर्मीय द्वेष पसरून संविधान बदलण्याच्या मार्गावर आहे आणि आपकी बार 400 पार च्या घोषणा देऊन भाजप देशातील लोकशाहीची हत्या करत आहे एकीकडे देशातील शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देत नाही नोकर भरती काढत नाही देशामध्ये महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून याकडे केंद्र सरकारने व राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत असून दुसरीकडे मात्र देशातील शेतकरी व सामान्य गोरगरीब यांना खोटे आश्वासन देऊन देशातील जनतेची मोठ्या प्रमाणात दिशाभूल करत आहे. एकंदरीतच भाजप ही देशातील लोकशाहीची हत्या करून हुकूमशाही दडपशाही आणण्याचे पाप करत आहे. केंद्र सरकार विरुद्ध देशातील कोणता नेता आवाज उठवला तर लगेचच त्यांच्यावर ईडीसीबीआय सारख्या चौकशा लावून व त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये घालण्याचा विडाच भाजपने उचललेला आहे. त्यामुळे एकंदरी देशांमध्ये हुकूमशाही माजत आहे. भाजप देशातील प्रत्येक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष फोडून देशातील नेतेमंडळी यांना इडीचा धाक दाखवीत आहे. ईडीच्या धाकामुळे अनेक नेते व कार्यकर्ते दडपशाही खाली वावरत असल्याचे . असेही श्री वसंतराव चव्हाण यांनी भाजपची विकास कामाची पोलखोल करत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
सदर बैठकीत उपस्थित जनतेला मार्गदर्शन करत असताना उपस्थितांना भावनिक साद देखील घालण्यात आल्याची दिसून आले आहे. श्री वसंतराव चव्हाण यांनी म्हणाले की, माझे छत्र हे माझे वडील होते त्यांचा आशीर्वाद घेऊनच मी पुढील कार्य करत होतो पण ते सध्या हयात नसल्याने आता माझे छत्र हे तुम्हीच सर्वजण जनता मायबाप आहे. आणि तुम्हीच मला आशीर्वाद द्या नांदेड लोकसभेची विजयाची माळ खेचून आणण्याची पूर्ण जबाबदार ही तुमच्यावर म्हणजेच जिल्ह्यातील सर्व जनतेवरच राहणार आहे त्यामुळे तुमचे प्रेम आशीर्वाद हेच माझी ऊर्जा असणार आहे असे हे श्री वसंतराव चव्हाण यांनी म्हणाले.
तर सदर बैठकीत पुढे काँग्रेस पक्ष्यांचे प्रदेश सचिव श्री केदार पाटील साळुंखे म्हणाले की भाजपा ही देशांमध्ये सत्तेवर येण्यापूर्वी केवळ पोकळ आश्वासन देऊन सत्तेवर आली आणि सत्तेवर आले पासून देशातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना ईडी सारख्या चौकशा लावून देश कमकुवत करत आहे तर पुढे शिवसेना (उबाठा )गटाचे नेते श्री बालाजी मांजरमकर व नायगाव तालुका अध्यक्ष श्री रवींद्र पाटील भिलवंडे यांनी म्हणाले की शिवसेना ही फोडून भाजपला फायदा मिळवायचं होतं पण त्या पापाचा गढा हे भाजपच्या मुळावरच आला कारण भाजपला राज्यातील तीन पक्ष फोडून देखील समाधानी नाही यातच भाजप चा देशामध्ये पराभव निश्चित आहे म्हणून नांदेडमध्ये महाविकास आघाडी चे काम शिवसेनेच्या वतीने जोरदार करणार असल्याचे श्री भिलवंडे यांनी म्हणाले.
तर पुढे नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार श्री हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी म्हणाले की काँग्रेसच्या झेंडा खाली राहूनच काँग्रेसला पुन्हा उभारी देऊ जिल्ह्यातील काही नेते भाजपात गेले असतील पण राहिलेले नेते कार्यकर्तेह मतदार जशाला तशी काँग्रेसमध्ये आहेत आणि राहणार नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसकडून भाग्यवान माणूस मिळाला आणि हक्काचा माणूस मिळाला त्यामुळे आम्हा कार्यकर्त्यांना काँग्रेसचे काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. तर पुढे श्री मनोज पाटील मोरे यांनी म्हणाले की देशांमध्ये श्री राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून देशातील जनतेच्या समस्या जाणून घेतले व ते समस्या लवकरच दूर करणार आणि श्री राहुल गांधी यांच्या नेतृत्व देशांमध्ये काँग्रेस प्रणित सरकार येणार असाही विश्वास दाखवलेले आहे.
सदर कार्यक्रमात प्रस्ताविक नायगाव विधानसभेचे युवा नेते व प्रा श्री रविंद्र पाटील चव्हाण यांनी केले आहे. तर नायगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जिल्ह्यातील स्वच्छता दूत म्हणून ओळख असलेले श्री माधवराव पाटील शेळगावकर, प्रमुख अतिथी हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार श्री वसंतराव पाटील चव्हाण, श्री मनोज पाटील मोरे,श्री केदार पाटील साळुंखे, मोहनराव पाटील धुपेकर,श्री दिलीपराव धर्माधिकारी,शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, सय्यद रहीम शेख,बालाजी मांजरमकर, रवींद्र पाटील भिलवंडे, श्री दत्तात्रेय आईलवार, श्री लंगडा पुरे आधी महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येमध्ये असलेले नायगाव तालुक्यातील मतदार बंधू उपस्थित होते.