2024 च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघात ओबीसी बांधवांचे मते महत्वाचे ठरणार? – बाबाराव जरगेवाड ओबीसी तालुका अध्यक्ष

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

प्रतिनिधी/माधव काईतवाड 

हिमायतनगर:-हिंगोली लोकसभे सह राज्यात तीस पेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघात ओबीसी समुहाचे मतदान फार मोठे असून,त्यां वरच खासदार पदाचे उमेदवार विजय-पराभव होऊ शकतात.त्यामुळे ओबीसी समूहाची ताकद फार मोठी असून,या लोकसभा मतदारसंघातील ओबीसी समूहाला अजगराची उपमा राजकीय विश्लेषकानी आज पर्यंत दिलेली आहे. ती केव्हाही आपले उमेदवार भक्ष म्हणून गिळंकृत करु शकतो.नाही तर वर्षोवर्ष सुस्त अवस्थेत पडून राहू शकतो.मात्र हिंगोली व नांदेड लोकसभेच्या जागा वाटपाचा विचार करता ओबीसी समूहातील एकाही आगामी लोकसभेला उमेदवाराला राजकीय पक्षाकडून उमेदवारी अद्याप अद्याप तरी मिळालेली नाही आहे.

 

केंद्र व राज्य सरकारने ओबीसी समूहाचे अनेक प्रश्न असो की ओबीसी आरक्षण वाचविणे बाबत ठोस अशी भूमिका अद्याप तरी मांडलेली नाही.त्यामुळे राज्यात ओबीसी कडून वारंवार संताप व्यक्त होऊन,ओबीसी समुहाने मोठमोठे ओबीसी मेळावे, रास्ता रोको आंदोलने आदी करीत ताकद दाखवून दिली होती.नांदेड व हिंगोली लोकसभा मतदारसंघात नेहमीच काँग्रेस,शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपकडून ओबीसी उमेदवारांना संधी देण्याऐवजी नेहमीच डावलले जात असते.असा इतिहास हिंगोली व नांदेड लोकसभेसाठी आहे.

 

हिंगोली व नांदेड लोकसभा मतदारसंघात ओबीसी समूहा पैकी धनगर,हटकर,बंजारा,माळी,लिंगायत वाणी या समाजाचे राजकीय नेते सर्वंच पक्षात ईमानदारीने काम करून, नेहमीच पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्यासाठी साम,दाम,दंड, भेदाचा वापर करून पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल.यासाठीच प्रयत्न केल्याचे दिसून येत असते.निवडून आलेला खासदार पुन्हा दिल्ली दरबारी जाऊन स्वतःच्या हितासाठी काम करून,आपल्या व आपल्या कुटुंबाच्या नावावर कोटीच्यां कोटी . त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्यांच्या खासदारकीचा कोणताही फायदा होताना दिसून येत नाही.केवळ आपल्या नातेवाईकांचे भले करणे व आपल्या समाजातील लहान-मोठे नेते, कार्यकर्ते यांना फायदा मिळून देणे एवढेच काम आज पर्यंत झालेले आहे.विविध राजकीय पक्षातील आजी-माजी खासदार यांनी केले असल्याचा गंभीर आरोप ओबीसी समूहातून यावेळी केला आहे.त्यामुळे दोन्ही लोकसभा मतदारसंघात असा प्रकार आजपर्यंत दिसुन आलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ओबीसी समूहाचे मते हिंगोली व नांदेड जिल्ह्यात उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णय ठरणार आहेत.ओबीसींच्या भविष्यासाठी ते फार मोठे महत्त्वाचे ठरणार आहे.या मतावर त्या लोकसभेच्या उमेदवाराचा विजय व पराभव निश्चित होणार आहे. परंतु ओबीसी समूह एक संघ नसल्याने लोकसभेच्या उमेदवाराचे प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये फावत आहे.संसदेत प्रवेश त्यांचा नेहमीच सुखकर झालेला असल्याने,यावेळी तरी ओबीसी समूहाने विचाराची वज्रमुठ बांधून आपले मते कोणास व कशासाठी द्यावे यांचा विचार करणे गरजेचे असल्याचे,ओबीसी समाजातील राजकीय विश्लेषकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे.

Share This Article
error: Content is protected !!