कृषी उत्पन्न बाजार समिती च्या संचालक मंडळाच्या भुसार मार्केट बंद च्या निर्णयाला केराची टोपली…

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

प्रतिनीधी/माधव काईतवाड बोरगडीकर

हिमायतनगर:- तालुक्याची कृषी उत्पन्न बाजार समिती हि शेतकरी व आडत व्यापारी,हमाल,मापाडी, यांच्यातील महत्वाचा दुवा आहे.

 

बाजार समिती हि आडत व्यापारी. यांच्या कामावर म्हणजेच माल खरेदी-विक्री यावर निरक्षण ठेवत असते.त्यामुळे शेतकऱ्यांना शेत माल विकण्यासाठी कोणत्याही स्वरुपाची अडचण,व्यापाऱ्यांकडे माल विकतांना त्यांची काही पिळवणुक होणार नाही यासाठी काम करते .यांच पाश्वभुमिवर कृषी उत्पन्न बाजार समितीने आडत व्यापारी व शेतकऱ्यांसाठी तसेच हमाल ,मापाडी यांचे आडत व्यापाऱ्यांकडे काम करत असतांना त्यांची वयक्तीक अनेक कामे खोळबलेली असतात.त्यांना त्यांची वयक्तीक कामे करता यावीत म्हणुन दि.१०/३/२०२४ रोजी बाजार समितीचे सभापती व सर्व संचालक मंडळ व हमाल,मापाडी यांच्या उपस्थीत महत्त्वपुर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते आडत मार्केट दर गुरुवारी ला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

त्या निर्णयाबाबत चे पत्रक काढुन व्यापारांना सुचना करण्यात आल्या पण हिमायतनगर शहरातील काही व्यापाऱ्यांनी या निर्णयांचे स्वागत देखील केले.पण काही व्यापाऱ्यांनी या निर्णयाला केराची टोपली दाखवली असे चित्र दिसत आहे.यावरुन असे दिसुन येत आहे की बाजार समितीचे निर्णय हे केवळ कागदावरच लागु होतांना दिसत आहेत.बाजार समितीच्या संचालकांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी ठाम निर्णय घेणे काळाची गरज आहे असे मत मार्केट मध्ये काम करणाऱ्या हमाल,मापाडी,ड्रायव्हर,यांच्या मुखातुन ऐकावयास मिळत आहे

Share This Article
error: Content is protected !!