लक्ष्मण भैरेवाड
हिमायतनगर – आज सकाळी हिमायतनगर येथे 4-30 वाजताच्या सुमारास एका मुस्लिम व भक्ताने दिलेली माहिती आम्ही 112 वर कॉल करून पोलिसांना कळवली होती.
हिमायतनगर पोलीस स्टेशन येथील श्री नागरगोजे साहेब गायकवाड साहेब यांनी पोलीस निरीक्षक श्री जराड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ दोन्ही वाहनं MH26BE1813 आणि MH29BE5472 पकडून 23 गोवंशास जीवनदान दिले आहे.
सदरील गोवंश आणि यापुर्वी देखील नांदेड जिल्ह्यात झालेल्या विविध कारवाई मध्ये जप्त केलेले गोवंश हे मोठ्या प्रमाणावर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथुन कत्तलीसाठी तेलंगणामध्ये तस्करी करत आहेत. आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे संबंधित गोतस्करांचे जे रॅकेट आहे, त्याची सखोल चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. विदर्भातुन होत असलेल्या गोवंशाच्या तस्करी संदर्भात आम्ही माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य व माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे रीतसर निवेदन देऊन या तस्करांचा पर्दाफाश करण्याची विनंती केलेली आहे.