मोदी पून्हा एकदा पंतप्रधान व चिखलीकर खासदार व्हावेत यासाठी ठाकूर २४तास प्रचार कार्यालयात उपलब्ध  

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी

नांदेड जिल्हा – महायुतीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नांदेड येथील निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी २३ मार्च रोजी करण्यात आले. तेंव्हापासून नांदेड लोकसभा कार्यालय प्रमुख तथा भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आपला बाडबिस्तरा कार्यालयात हलविला आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व प्रतापराव पाटील चिखलीकर हे दुसऱ्यांदा नांदेडचे खासदार व्हावेत यासाठी ठाकूर हे २४ तास कार्यालयात उपलब्ध असून, अहोरात्र प्रचारासाठी झटत असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.*

इतिहासात डोकावून पाहिले तर,यापूर्वी दिलीप ठाकूर यांनी १९९५ व १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाशभाऊ खेडकर तसेच २००४ ला अनुसयाताई खेडकर यांच्या निवडणुकीत पूर्ण वेळ उपस्थित राहून प्रचार यंत्रणा राबविली होती.२००४ च्या लोकसभा निवडणुकीत डी.बी.पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे प्रमुख म्हणून पूर्णवेळ काम पाहिले.विशेष म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देखील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ ३५ दिवस गोदावरी हॉटेलच्या प्रचार कार्यालयात तळ ठोकला होता.दिलीप ठाकूर यांचा निवडणुकीचा पूर्वानुभव पाहून या निवडणुकीत देखील त्यांच्यावर खा. चिखलीकर यांनी प्रचार कार्यालयाची जबाबदारी सोपवली आहे. 

         

चिखलीकर यांचे बोरबन भागात अतिशय अद्यावत प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयात संगणक विभाग, वार रूम, पत्रकार परिषद कक्ष, भांडार कक्ष, कॉल सेंटर, बैठक कक्ष यासहित अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना व्यवस्थित माहिती मिळावी यासाठी कर्मचारी व पक्षाचे पदाधिकारी मिळून २१ जणांची टीम कार्यालयात कार्यरत आहे.छोट्या-मोठ्या बैठका घेण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. या कार्यालयामार्फत संपूर्ण नांदेड लोकसभा मतदारसंघात दैनंदिन संपर्क करण्यात येतो. खा. चिखलीकर व इतरांच्या दौऱ्यांचे नियोजन करण्यात येते.वाहन परवाना, सभा, रॅली इत्यादी बाबतीत लागणाऱ्या परवानग्या काढण्यात येतात. रोजच्या खर्चाचे विवरण निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येते. वृत्तपत्रात आलेल्या रोजच्या बातम्यांचे संग्रह करण्यात येते. २९९४९९ हा नवीन दूरध्वनी क्रमांक निवडणूक कालावधीसाठी कार्यालयात घेण्यात आला आहे. “मतदारांनी अधिक माहितीसाठी या दूरध्वनीवर संपर्क साधावा ! असे आवाहन दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!