व्हाटस अॅपवर प्रचार ;नांदेड जिल्ह्यातील कर्मचारी निलंबित

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

निवडणूक काळात प्रचार करून आचारसंहितेचा भंग करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला आज निलंबित करण्यात आले आहे.

नांदेड – पंचायत समिती नायगाव येथील यु. एस. धोटे या वरिष्ठ सहाय्यकाला निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज जारी केले आहे.

     ‘व्हाट्सअप ‘द्वारे निवडणुकीच्या प्रचाराबाबतचा संदेश देऊन या कर्मचाऱ्याने आदर्श आचारसंहितेच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात निलंबनाची ही पहिली कारवाई ठरली असून आदर्श आचारसंहितेचा भंग कोणाकडूनही होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!