मुंबई : ‘म्हारी छोरियाँ, छोरोंसे कम है क्या?’ ‘दंगल’ सिनेमातल्या या वाक्यानं सिनेमागृहात टाळ्या घेतल्या होत्याच पण प्रत्यक्ष काय आहे आपल्या समाजातली परिस्थिती? आपण पुरोगामी आहोत, असं सांगताना घरातला मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक देतो का, यापेक्षा मुलीला आजही आपण ओझंच मानतो आहोत, अशी अनेक उदाहरणं समाजात दिसतात. भोपाळमध्ये कुटुंबीयांच्या अशा मानसिकतेमुळे एका महिलेला आपल्या पोटच्या मुलींचा जीव घ्यावा लागला.