महाराष्ट्रातील भंडारा-गोंदियाची लोकसभा जागा रेकॉर्डब्रेक मतांनी जिंकणार – देवेंद्र फडणवीस 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

भंडारा जिल्हा प्रतिनिधी/

भंडारा – भंडारा-गोंदिया लोकसभेतील भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित जहीर सभेत जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. प्रफुल्ल पटेल, आ. विजय रहांगडाले, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कोरेमोरे, आ. विनोद अग्रवाल, आ. नरेंद्र भोंडेकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाने प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. गेल्या 10 वर्षात सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा सर्वाधिक फायदा गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांना झाला आहे. विकास आणि राष्ट्रवादाची विचारधारा भंडारा-गोंदियातून सुनील मेंढे यांना पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी जनता सज्ज असल्याचे जाहीर सभेतील जनतेचा उत्साह आणि पाठिंबा यावरून स्पष्ट होत आहे.

Share This Article
error: Content is protected !!