नांदेड जिल्हा प्रतिनिधी/
नांदेड – लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठीशी खंबीरपणे राहुन नायगाव विधानसभा मतदारसंघातुन जास्तीच मताधिक्य देऊन पुन्हा लोकसभेत पाठवावे.
लोकसभा निवडणूक २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नायगाव विधानसभा मतदारसंघातील बुथप्रमुखांचा मेळावा नायगाव येथे आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्याला संबोधित करताना आपण भारतीय जनता पक्षात केलेल्या कामाची पावती म्हणून त्या मेहनतीच फळ पक्षाने दिले असे सांगितले व निष्ठावंत कार्यकत्याला भारतीय जनता पक्षात संधी नक्कीच मिळते पक्षासाठी निष्ठेने काम करा असे संबोधित केले, व नायगाव विधानसभा मतदारसंघातुन जास्तीच्या मताधिक्याने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पुर्ण ताकदीने विजयी करून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हात बळकट करावे असे बुथ कार्यकर्त्याना संबोधित केले.यावेळी ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब, महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, लोकप्रिय आमदार राजेश पवार साहेब, आमदार राम पाटील रातोळीकर साहेब, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष दक्षिण संतुकराव हंबर्डे साहेब, जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख साहेब, महिला जिल्हाध्यक्षा पुनमताई पवार आदी उपस्थित होते.