अण्णाने केली कहर शहरात मटका गुटका चक्री लॉटरीचे आली लहर

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

मुझे पकडना मुश्किल ही नहीं ना मुमकीन है मैं हू मटकाकिंग

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील धर्माबाद शहरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या मटका जुगाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.चालू आठवड्यापासून मटका जुगाराचा बाजार जोमात असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.गुन्हे शाखेने काही बुकी चालकांचा मुसक्या आवळल्या.परंतु, त्यानंतर खुलेआम मटका सुरू असल्याचे चित्र आहे. 

मटका सुरू करण्याकरिता मटका बुकीचालकांनी बिर्याणी पार्टी देऊन टपरी, शटर धारकांना सूचना केल्याचे वृत्त आहे.आता टपर्‍यांमधून पूर्वीप्रमाणेच खुलेआमपणे चिट्टय़ा दिल्या जात आहेत. धर्माबाद शहरात खुलेआम पद्धतीने मटका गुटका ऑनलाईन चक्री शटर बंद करून शहरात जोमात चालू आहेत.

शहरातील मटका किंग आपल्या फंटरांना ऑनलाईन मटका घेण्यास प्रवृत्त करीत आहेत तुमच्याकडे कोणी येत नाही कोणी आल्यास माझे नाव त्यांना सांगा असा आत्मविश्वास फंटरांमध्ये वाढविला जात आहे.

Share This Article
error: Content is protected !!