नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे. शुक्रवारी ते म्हणाले की, केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण दिले जाईल.
पक्षाच्या ‘नारी न्याय’ गॅरंटी संदर्भ देत राहुल म्हणाले की, 50 टक्के सरकारी पदांवर महिलांची भरती केली जाईल. यामुळे देशातील प्रत्येक महिला सक्षम होईल आणि सशक्त महिला भारताचे भविष्य बदलतील.
राहुल गांधींनी X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. त्यात ते म्हणाले आहेत की, ‘आजही तीनपैकी एक महिलाच का नोकरी करते? 10 सरकारी नोकऱ्यांपैकी फक्त एकाच पदावर महिला का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.